तुमच्या मित्र-मंडळींच्या किंवा कुटुंबाच्या व्हाट्सॲपची ग्रुपवर ‘पिंक व्हाट्सॲप’ची तुम्ही पाहिली असेल.स्वतः व्हाट्सॲपने नवीन व्हर्जन आणले असून यात सामान्य व्हाट्सॲपपेक्षा अधिक सुविधा दिल्या जात आहेत असा आशयाचा मेसेज या लिंकसोबत शेयर केला जात आहे. अनेकांना हा मेसेज खरा आहे असे वाटले आणि त्यांनी या लिंकवर जाऊन पिंक व्हाट्सॲप डाऊनलोड केले आहे. अशा युजर्सला आता वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. चला तर जाणून घेऊया हे पिंक व्हाट्सॲपचे नेमके प्रकरण काय आहे?
खरे तर मेटाच्या मालकीचे व्हाट्सॲप हे भारतातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. याचे करोडो वापरकर्ते भारतात आहे. व्हाट्सॲपच्या याच लोकप्रियतेचा गैरफायदा स्कॅमर आणि हॅकर्स घेताना दिसत आहेत. त्यामुळेच सामान्य वापरकर्त्यांना बनावट मेसेज पाठवून त्यांना व्हाट्सॲप अपडेट करण्यासाठी सांगितले जात आहे. त्याचबरोबर या नव्या अपडेटमध्ये वापरकर्त्यांना नवनवीन फीचर्स आणि बऱ्याच सुविधा दिल्या जाणार आहेत असे सांगितले जात आहे. या अमिषाला बळी पडून अनेकांनी त्यांच्या स्मार्टफोनमध्ये हे पिंक व्हाट्सॲप डाऊनलोड केले आहे.
अलीकडेच, मुंबई पोलिसांनी 'पिंक व्हाट्सॲप' च्या वाढत्या गैरप्रकाराबाबत सार्वजनिक सूचना जाहीर केली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की ,व्हाट्सॲपने असे कुठलेही नवीन अपडेट आणलेले नाही. हा मेसेज पूर्णतः बनावट असून ज्यांनी कुणी त्यांच्या मोबाईलमध्ये हे व्हाट्सॲप डाउनलोड केले असेल त्यांनी त्वरित ते अनइंस्टाल करावे. यामुळे नागरिकांना नुकसान सहन करावे लागू शकते.
*... WHATSAPP PINK -A Red Alert For Android Users ...*'
— NORTH REGION CYBER POLICE CRIME WING (@north_mum) June 16, 2023
*... व्हॉट्सॲप पिंक Android वापरकर्त्यांसाठी रेड अलर्ट ...*
*...व्हाट्सएप गुलाबी (पिंक) Android उपयोगकर्ताओं के लिए एक रेड अलर्ट...*#CyberSafeMumbai
REGARDS,
NORTH REGION CYBER POLICE STATION,
CRIME BRANCH, CID, MUMBAI pic.twitter.com/viTbVrcWrn
होऊ शकते आर्थिक फसवणूक
व्हाट्सॲप युजर्सला मुंबई पोलिसांनी सल्ला देताना म्हटले आहे की, हे व्हाट्सॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यास तुमच्या मोबाईलचा संपूर्ण ताबा हा स्कॅमर आणि हॅकर्सकडे जातो आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलमधील मेसेज, वेगवेगळे ॲप्लिकेशन स्कॅमर वापरू शकतात. तुमच्या मोबाईलमध्ये जर बँक ॲप्लिकेशन असेल तर त्याचे डीटेल्स, बँक खात्याची संवेदनशील माहिती, ओटीपी स्कॅमर आणि हॅकर्स सहज मिळवू शकतात आणि त्यामुळे तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते.
गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसते आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसोबत आर्थिक अपहार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. तंत्रज्ञानाची समज नसल्यामुळे स्कॅमर आणि हॅकर्स सहजपणे त्यांची फसवणूक करू लागले आहेत. तुमच्या घरातील वयस्कर मंडळींना देखील तुम्ही या वाढत्या सायबर गुन्ह्यांबद्दल सजग केले पाहिजे.