ब्लॅक वॉटर हे अल्कलाईन वॉटर म्हणूनही ओळखले जाते. हे खरंच रंगाने काळे असते आणि यामध्ये असणारे घटक ही खूपच वेगळे आहेत. या पाण्यामध्ये क्षारचे प्रमाण अधिक असल्यामुळे याला क्षारयुक्त पाणी देखील म्हटले जाते. आपण जे नेहमी पाणी पितो. त्या पाण्यामध्ये असलेली पोषक तत्त्वे काळ्या पाण्यामध्ये अधिक असतात आणि त्याचा शरीराला फायदा होतो, म्हणून याची किंमत सुद्धा साधारण पाण्यापेक्षा खूपच जास्त असते.
काळ्या पाण्यातील महत्त्वाचे गुणधर्म
अमेरिकेतील थॉमस जेफरसन विद्यापीठात केलेल्या संशोधनानुसार, ब्लॅक वॉटर प्यायल्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह सुरळित राहतो. तसेच या पाण्याच्या सेवनामुळे पचनशक्ती वाढून बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते, असे जपानमधील ओसाका विद्यापीठातील संशोधनामधून बाहेर आले आहे. याची चव देखील साधारण पाण्यापेक्षा वेगळी असते आणि या पाण्याच्या सेवनामुळे दात पांढरेशुभ्र राहण्यास मदत होते.
सेलिब्रेटींचे ब्लॅक वॉटर ब्रॅण्ड
आपला डॅशिंग क्रिकेटर विराट कोहली याच्याबद्दल मिडियामध्ये नेहमीच चर्चा सुरू असते. तो खातो काय? पितो काय? त्याच्या फिटनेसचे रहस्य काय? तो यासाठी किती पैसे खर्च करतो. तर मित्रांनो, विराट कोहली ज्या कंपनीचे किंवा ब्रॅण्डचे पाणी पितो ना, त्या ब्रॅण्डच्या एका लिटर पाण्याची किंमत आहे, 4000 रुपये. ही कंपनी फ्रान्समधील असून तिचे नाव Evian आहे. इव्हिअन नॅचरल स्प्रिंगचे पाणी जगभरात उपलब्ध आहे. पण त्याचा मुख्य स्त्रोत हा फ्रान्समधील इव्हिअन लेस बेन्स इथला आहे. हे ठिकाण स्वित्झर्लंड आणि फ्रान्सच्या सीमेवर आहे. हे पाणी सर्वात शुद्ध व नैसर्गिक पाणी मानले जाते. विराट कोहलीप्रमाणेच बॉलिवूडमधील सेलिब्रेटी मलायका अरोरा, करिश्मा कपूर, मनिष मल्होत्रा, श्रृती हसन आणि उर्वशी रौतेला हे ब्लॅक वॉटर पितात.
जगातील सर्वांत महाग पाण्याची बॉटल
जगातील सर्वांत महाग पाण्याच्या बॉटलची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. Acqua di Cristallo कंपनीच्या या बॉटली किंमत 107,200 डॉलर असून त्याची बॉटल 24 कॅरेट सोन्यापासून बनवलेली आहे. यामध्ये वापरले जाणारे पाणी हे आईसलॅण्ड, फिजी आणि फ्रान्समधून घेतले जाते. त्यानंतर जपानमधील Fillico Jewelry या कंपनीचा क्रमांक लागतो. याची किंमत 14,463 डॉलर इतकी आहे.