Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

National Consumer Day: जागतिक आणि राष्ट्रीय ग्राहक दिनाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?

National Consumer Day 2022

National Consumer Day: ग्राहकांनी कोणत्याही वस्तुंची खरेदी करताना त्याची पारख तर करावीच; त्याचबरोबर ती वस्तू खरेदी करताना सावधानताही बाळगणे गरजेचे आहे.

National Consumer Day: कोणत्याही वस्तुंची खरेदी करताना ग्राहकांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता त्या वस्तुंची पारख करावी. वस्तुंची ऑनलाईन खरेदी करताना तर ग्राहकांनी सावधगिरीही बाळगायला हवी आणि ग्राहक म्हणून आपल्या हक्कांबद्दल जागरूक रहावे, यासाठी संपूर्ण जगभर 15 मार्चला जागतिक ग्राहक दिन (World Consumer Day) साजरा केला जातो. तर भारतात तो 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन (National Consumer Day) म्हणून साजरा केला जातो.

जागतिक ग्राहक दिनाचा इतिहास काय आहे?

जागतिक ग्राहक दिनाची प्रेरणा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी (John F Kennedy, Former US President) यांच्याकडून घेतली गेली. त्यांनी 15 मार्च 1962 रोजी युएस कॉंगेसला ग्राहक हक्काचा मुद्दा ठळकपणे मांडलेला एक संदेश पाठवला होता. असे करण्याचे धाडस याआधी कोणीही केले नव्हते. त्यानंतर ग्राहक चळवळीने 1983 मधील तारीख ठरवून 15 मार्चपासून ग्राहक हक्क दिनानिमित्त ग्राहकांच्या महत्त्वाच्या समस्यांवर योग्य दिशा देऊन त्या सोडविण्यासाठी हा दिवस साजरा केला जाऊ लागला.

Consumer Rights 2022

राष्ट्रीय ग्राहक दिनाची सुरूवात कधी झाली? 

भारतात ग्राहक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी 24 डिसेंबर 1986 या दिवशी झाल्यामुळे तो दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन (National Consumer Day) म्हणून साजरा केला जातो. 1986च्या कायद्यात काही वर्षानंतर सुधारणा करण्यात आली. त्यानुसार ग्राहक संरक्षण कायदा, 2019 नुसार त्यात काही बदल करण्यात आले. हा सुधारित कायदा 20 जुलै, 2020 पासून लागू झाला.

1986च्या कायद्यात अशा कोणत्या गोष्टी नव्हत्या की, ज्यामुळे त्यात सुधारणा करण्यात आली आणि नवीन कायदा अस्तित्वात आला. त्या गोष्टी आपण जाणून घेऊ.

क्रमांक

1986च्या कायद्यातील तरतुदी

2019च्या कायद्यातील तरतुदी

1

सेंट्रल रेग्युलेटरी ऑथॉरिटीचा समावेश नव्हता

सेंट्रल रेग्युलेटरी ऑथॉरिटीचा समावेश आहे.

2

जिथे विक्रेता राहतो त्या हद्दीत येणाऱ्या कोर्टातच तक्रार दाखल  करू शकता.

ग्राहक जिथे राहतो त्या हद्दीतील कोणत्याही कोर्टात किंवा जिथे फसवणूक झाली असेल त्या कोणत्याही विभागातून तक्रार दाखल करू शकता.

3

ऑनलाईन सुविधा अस्तित्वात नसल्याने त्यासंदर्भात कायदा नव्हता.

इ-कॉमर्स , ऑनलाईनमार्फत फसवणूक झाली तर कोर्टात हजर राहता आले नाही तरीही व्हिडीओ कॉन्फेरंन्सची सेवा उपलब्ध आहे.

4

जाहिरातींबद्दल जास्त नियम नव्हते.

जाहिरातींद्वारे चुकीची माहिती पुरवल्यास जाहिरात करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करू शकता.


ग्राहक संरक्षण कायद्यातील वेगवेगळ्या तरतुदींचा आधार घेऊन ग्राहक आपल्या हक्कांसाठी दाद मागू शकतात. तसेच आपल्या हक्कांसाठी तक्रार नोंदवून कायदेशीर लढाई लढू शकतात.