कंपनीच्या शेअरनं (Share) मागच्या काही दिवसांत चांगली कामगिरी नोंदवली आहे. जूनच्या तिमाहीत विशेषकरून ही कामगिरी नोंद घेण्यासारखी होती. सोमवारी (24 जुलै) कंपनीच्या शेअरमध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळाली. हे शेअर जवळपास 19 टक्क्यांनी वधारलेले दिसून आले. याचाच परिणाम असा, की केवळ 4 महिन्यांच्या कालावधीत डोडला डेअरीचा (Dodla Dairy) शेअर मल्टीबॅगर (Multibagger) झाला. शेअर बाजारात डोडला डेअरीचे शेअर 19 टक्क्यांनी वाढून 908.40 रुपयांवर पोहोचले.
Table of contents [Show]
उच्चांक आणि नीचांक
साधारणपणे मागच्या 52 आठवड्यांच्या कालावधीचा विचार केल्यास सोमवारचं शेअरचं प्रदर्शन हे सर्वात उच्च होतं. कंपनीचं मार्केट कॅप आता वाढलं आहे. तर स्टॉकचा विचार करता ते 45 टक्क्यांनी वधारले. सध्या डोडलाचे शेअर मल्टीबॅगरचा दावा करत आहेत. याचं महत्त्वाचं कारण या वर्षातल्या 13 मार्चमध्ये शेअर 417 या त्याच्या नीचांकी पातळीवर नोंदवला गेला. मागच्या 3 महिन्यात स्टॉक 90 टक्क्यांनी तर महिन्याभरात 50 टक्क्यांनी वाढला.
शेअर वधारले तसं कंपनीच्या नफ्यातही वाढ होत आहे. इअर-टू-इअर निव्वळ नफ्यात 41 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. ही वाढ 35 कोटी इतकी नोंदवली गेली आहे. पॅटमध्येही (Profit after tax) वाढ झाली आहे. 30 जून 2023ला संपलेल्या तिमाहीत पॅट मार्जिन 77 बेसिस पॉइंटनं वाढून 4.2 टक्के इतकी नोंदवली गेली. ही वाढ वार्षिक आधारावर आहे.
महसुलाची आकडेवारी
डोडला डेअरीच्या महसुलातही वाढ दिसून आली आहे. कंपनीचा महसूल या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 15 टक्क्यांनी वाढला आहे. जर मागच्या वर्षीच्या याच कालावधीचा विचार केला तर तो 717 कोटी रुपये होता. आता तो 800 कोटी रुपयांहूनही अधिक झाला आहे. एबिट्डा (EDITDA) 34 टक्के वाढून 60.3 कोटी रुपये झाला. ही वाढ वार्षिक आधारावर नोंदवली गेली आहे. शेअर 4 महिन्यात मल्टीबॅगर होत असल्याचं बोललं जात असलं तरी त्याची लिस्टींग जून 2021 साली झाली होती. साधारणपणे 421-428 रुपयांच्या दरम्यान कंपनीनं शेअर विकले. त्यातून 520 कोटी जमवले. आता याच पैशाच्या दुप्पट कमाई कंपनीनं केली आहे.
डोडलाविषयी...
डोडला डेअरीची स्थापना 1995 साली झाली. तेलंगाणातल्या हैदराबादमध्ये कंपनीचं मुख्यालय आहे. कंपनीचे 5 राज्यात सेंटर्स असून 11 राज्यांमध्ये विविध प्रॉडक्ट्स वितरीत केले जातात. कंपनी प्रामुख्याने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करून विक्री करते. यात दुधासह, फ्लेवर्ड मिल्क म्हणजेच सुगंधी दूध, दही, ताक, पनीर, तूप, मिठाई तसंच इतर लोकप्रिय डेअरी प्रॉडक्ट्स तयार करते.