एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर होणाऱ्या पश्चातापाच्या स्थितीला बायर्स-रिमोर्स (Buyer-Remorse) म्हणतात. अशी पश्चातापाची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून काय करावे? ते आपण जाणून घेऊया.
Table of contents [Show]
- खरेदीवर मर्यादा घालण्याची सवय लावा (Limit Your Purchase)
- खरेदीपूर्वी रिसर्च करा (Do Research before Purchase)
- रिटर्न पॉलिसी तपासून घ्या (Check Your Return Policy)
- बजेट फिक्सड् करा (Fixed Your Budget)
- ऑफर्सना बळी पडू नका (Don't Fall Prey to Offer)
- खरेदीच्या वस्तुंची यादी करा (Make a List before shopping)
खरेदीवर मर्यादा घालण्याची सवय लावा (Limit Your Purchase)
एखादी वस्तू आवडली आणि ती विकत घेतली की आपल्याला तात्पुरते समाधान मिळते. पण त्यानंतर अनेकदा अशा तात्पुरत्या आवडलेल्या वस्तू धूळखात पडतात. यामुळे आपले पैसे फुकट जातात. त्यामुळे शॉपिंग करताना खरेदीवर मर्यादा घालण्याची सवय लावा. वस्तूची आवश्यकता लक्षात घेऊनच खरेदी करा.
खरेदीपूर्वी रिसर्च करा (Do Research before Purchase)
कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तूची माहिती मिळवा. म्हणजेच खरेदीपूर्वी थोडा गुगलवर किंवा प्रत्यक्ष मार्केटमध्ये जाऊन रिसर्च करा. एखादी वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्या वस्तूची जेवढी जास्त माहिती असेल तितकेच नंतर तुम्हाला तुमच्या निर्णयाचा पश्चात्ताप होण्याची शक्यता कमी असते. जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर त्या वस्तुचे रिव्हिव पाहा, वाचा. त्यामुळे तुम्हाला त्या वस्तूबद्दल माहिती तर मिळतेच. शिवाय वस्तू खरेदी करावी किंवा नाही याबाबत निर्णय घेण्यासही मदत ही होते.
रिटर्न पॉलिसी तपासून घ्या (Check Your Return Policy)
अनेकदा असे होते की वस्तू घेतल्यानंतर ती न आवडल्यामुळे आपल्याला ती वस्तू विक्रेत्याला परत करावीशी वाटते. त्यामुळे वस्तू खरेदी करताना तिची रिटर्न पॉलिसी तपासून घेणे गरजेचे आहे. काही वस्तूंना एकदा विक्री झाल्यानंतर रिटर्न पॉलिसी नसते. त्यामुळे आपल्याला पश्चातापाला सामोरे जावे लागते. त्यामुळे खरेदीपूर्वी वस्तूची रिटर्न पॉलिसी नक्की तपासून घ्या.
बजेट फिक्सड् करा (Fixed Your Budget)
कोणत्याही खरेदीपूर्वी बजेट करण्याची सवय लावा. कारण संपूर्ण महिन्यात आपण किती आणि काय खरेदी करतो याची माहिती आपल्याकडे बजेट ठरवल्यामुळे मिळते. विविध अॅप्सच्या माध्यमातून आपण बजेट फिक्सड् करू शकता.
ऑफर्सना बळी पडू नका (Don't Fall Prey to Offer)
खरेदी कोणतीही असो, ऑनलाईन किंवा ऑफलाईन. खरेदी करताना प्रत्यक्ष भुरळ घालतात त्या ऑफर्स. त्यामुळे अनेकदा वस्तूची गरज नसतानाही ती खरेदी केली जाते. तेव्हा खरेदी करण्यापूर्वी ऑफर्स आहेत का नाही याची माहिती करूनच निर्णय घ्या.
खरेदीच्या वस्तुंची यादी करा (Make a List before shopping)
खरेदीनंतर बायर्स-रिमोर्सची परिस्थिती टाळण्यासाठी गरजेच्या वस्तुंची यादी तयार करा. त्यामुळे वस्तू खरेदीसाठी लागणारा वेळ आणि पैसे दोघांचीही बचत होते. याशिवाय आपल्याला बायर्स-रिमोर्सचा सामना करावा लागत नाही.