प्रत्येक व्यक्ती आरोग्य विम्यासाठी कलम 80D अंतर्गत एकूण वार्षिक उत्पन्नातून कर कपातीचा दावा करू शकतो. कुटुंबासाठी विमा खरेदी केल्यास देखील या कर कपातीचा लाभ मिळतो. आयकर कायद्यांतर्गत कर सवलतीचे अनेक प्रकार आहेत. हे नियोजन करून तुम्ही नवीन आर्थिक वर्षात टॅक्स बचत करू शकता.
किती कर सवलत मिळते?
स्वत:साठी, जोडीदारासाठी किंवा मुलांसाठी वार्षिक आरोग्य विमा प्रीमियम भरणारी कोणतीही व्यक्ती कलम 80D अंतर्गत 25,000 रुपयांपर्यंत (60 वर्षांपेक्षा कमी वयासाठी) लाभाचा दावा करू शकते आणि जर ती व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आणि भारतातील रहिवासी असेल तर 50,000 रुपयांपर्यंत हा लाभ घेता येतो. जर करदात्याने विमा खरेदी केला असेल आणि पालकाचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असल्यास, या कलमांतर्गत जास्तीत जास्त वजावट 1 लाखापर्यंत मिळते.
कर कपातीचा दावा करण्याचे मार्ग
पॉलिसी खरेदी करताना, विमा खरेदीदाराने 80D प्रमाणपत्र किंवा कर प्रमाणपत्र सोबत जोडणे महत्त्वाचे आहे. असे केले असेल तरच या आयकर लाभांचा दावा करण्यासाठी फाईल करताना सबमिट केले जाऊ शकते. तसेच हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, ही सवलत मिळवण्यासाठी प्रीमियम रोखीने भरला जाऊ नये (ITR मध्ये कपातीचा दावा करण्यासाठी). तसेच भरलेल्या प्रीमियमची पावती पॉलिसीच्या प्रतीसह कपातीचा दावा करण्यासाठी सबमिट करणे गरजेचे आहे.
काही रोगांच्या उपचारासाठी कर कपात
कलम 80DDB नुसार, एखाद्या व्यक्तीने काही विशिष्ट रोगांवर उपचार करण्यासाठी केलेला खर्च कर-सवलतीत गणला जातो. या रोगांमध्ये कर्करोग, पार्किन्सन, मज्जासंस्थेचे विकार आदी आजारांचा समावेश होतो. 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी, कर लाभाची कमाल मर्यादा 40,000 रुपये आहे.
Source: iciciprulife.com