• 28 Nov, 2022 13:58

भेट वस्तुंवरही टॅक्स भरावा लागतो? मग हा टॅक्स कोड क्रॅक करण्यासाठी नेमकं काय करायचं?

Tax on Gift

Tax on Gift : सणसमारंभ म्हटलं की भेटवस्तू आली. पण ही भेटवस्तू काय द्यावी यावर सुद्धा आता भरपूर विचार करावा लागतो. कारण इन्कम टॅक्स कायद्यानुसार भेटवस्तूवरही टॅक्स लागतो.

Gift Tax तुम्हाला माहित आहे का? एखाद्या आर्थिक वर्षात तुम्हाला मिळालेल्या भेटवस्तूंचे मूल्य 50 हजारांपेक्षा जास्त असल्यास त्यावर टॅक्स लागू होतो. मग ती भेट रोख स्वरुपात असो किंवा आणखी कोणत्या. जर ती मर्यादा ओलांडली गेली तर तुम्हाला या भेटवस्तू तुमच्या टॅक्स फाइलिंगमध्ये 'इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्ना' अंतर्गत समाविष्ट कराव्या लागतात आणि त्यावर टॅक्स भरावा लागतो. ( Tax is also payable on gifts.)

या वर्षी सण समारंभ सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. सण उत्सवाचा महिना म्हणजेच भेटवस्तूंचा पाऊस पडणार, देवाण घेवाणही होईल. काहीवेळा त्यावर टॅक्ससुद्धा भरावा लागतो. पण यावेळी तुम्ही टॅक्सची चिंता सोडा. कारण आम्ही तुमच्यासाठी असे काही मार्ग घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. दरवर्षीच सण उत्सवात भेटवस्तूंची अधिकाधिक देवाणघेवाण होते. पण यावर्षी जरा जास्तच होणार अशी शक्यता आहे. गेल्या अडीच वर्षात कोरोनामुळे सणसमारंभ घरातल्या घरात साजरे केले जात होते. यावेळी या उत्साहाला उधाण येऊ शकते.


गेल्या दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून भेटवस्तूही दिल्या जात नव्हत्या. यावर्षी मात्र अडीच वर्षाची कसर भरून काढण्यात येईल. भेटवस्तूंनी सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण होईल,. भेटवस्तू ज्याला मिळाली तो सुद्धा आंनदी, ज्याने दिली तोही आनंदी होईल. टॅक्समॅन देखील आनंदी होईल, आता तुम्ही म्हणाल तो कसा?  कारण कधीकधी, महागड्या भेटवस्तूंवर टॅक्स आकारला जातो, त्यामधून सरकारी तिजोरीलाही वाटा मिळतो. 

हे ऐकून कोणाला बर वाटेल की, भेटवस्तूंवर सुद्धा टॅक्स (Tax on Gift) लागतो, पण ते असंच आहे. आयुष्य आणि टॅक्स (Tax) या दोन्ही गोष्टी मिळत्या जुळत्या आहे. तुम्हाला तुमची भेटवस्तू सरकारसोबत शेअर करायची नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करू शकता, त्यासाठी काही ट्रिक्स आहेत. त्या ट्रिक्स काय आहेत, हे आपण समजून घेऊयात. समजा तुम्हाला तुमच्या A मित्राकडून 30 हजार रुपयांचे आणि B मित्राकडून 25 हजार रुपये किमतीचे गिफ्ट मिळाले. या गिफ्टचे वैयक्तिक मूल्य 50 हजारांपेक्षा कमी असले तरी तुम्हाला एकूण 55 हजार रुपयांवर टॅक्स लागू शकतो. कारण तुम्हाला गिफ्टमधून मिळालेल्या वस्तुंचं मूल्य मर्यादेपेक्षा जास्त आहे. मग अशा टॅक्सच्या कचाट्यातून बाहेर पडण्याचा उपाय काय? 

विवाहसोहळा! (Marriage)

तुमच्या लग्नासाठी तुम्हाला मिळणाऱ्या भेटवस्तूंवर कोणताही टॅक्स लागत नाही. मग ते गिफ्ट नातेवाईकांकडून मिळो किंवा इतर कोणाकडूनही मिळो. प्रत्यक्ष लग्नात आणि काही दिवसांनंतर मिळालेल्या भेटवस्तूंनाही टॅक्समधून सूट मिळते. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील तो मोठा दिवस लवकरच येत असेल, तर तुम्ही तुमच्या मित्रांना आणि हितचिंतकांना सांगू शकता की, ते आता तुम्हाला देऊ इच्छित असलेल्या कोणत्याही महागड्या भेटवस्तू लग्नात गिफ्ट म्हणून देऊ शकता. 

कुटुंब (Family)

भेटवस्तू देण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी तुमच्या नातेवाईकांना कधीही वाट पाहण्याची गरज नाही. इन्कम टॅक्स विभाग कुटुंबातील सदस्यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये नाक खुपसत नाही. अशी कोणतीही भेटवस्तू कितीही मोठी असली तरी त्यावर टॅक्स आकारला जात नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की, भारतीयांमध्ये एकत्रित कुटुंब पद्धती प्रचलित आहे. तसेच भारतीय हे जगभरात उत्सवप्रिय म्हणून ओळखले जातात. आपल्या कुटुंबात मोठ्या संख्येने नातेवाईक असतात. जसे की, पालक, आजी-आजोबा, भाऊ-बहिणी, नातवंडे, काका-काकी, मामा-मामी, आत्या, मावशी अशी भलीमोठी यादी करता येऊ शकते. पण यामध्ये तुमचा एखादा मित्र किंवा भागीदार हा नातेवाईक होऊ शकत नाही. अर्थात तुम्हाला ते नातं सिद्ध करावं लागतं. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला छान, महागडे टॅक्स-फ्री दागिने द्यायचे असतील तर तुम्हाला लग्नगाठ बांधावी लागेल.

सर्वच भेटवस्तुंवर टॅक्स लागतो का? 

तुम्हाला भेटवस्तू वारसा हक्काने मिळाल्यास किंवा मृत्युपत्राद्वारे मिळाल्यास त्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. मंजूर निधी, रुग्णालये, ट्रस्ट किंवा संस्थांकडून मिळालेल्या भेटवस्तू यादेखील टॅक्सच्या कक्षेबाहेर आहेत. अहस्तांतरणीय मालमत्तेवर टॅक्स लागू होतो. तुम्हाला जमीन आणि इमारती यांसारख्या मालमत्तेच्या भेटवस्तूंवर टॅक्स भरावा लागतो.

हस्तांतरणीय मालमत्तेवर टॅक्स लागू होत नाही.  जर तुम्हाला नवीन चमकदार स्मार्टफोन, Xbox किंवा एखादी कार भेट म्हणून मिळाली तर त्यावर कोणताही टॅक्स नाही. मिठाई आणि चॉकलेट यांसारख्या पारंपरिक भेटवस्तूंवर कोणताही टॅक्स नाही.

भेटवस्तूंचे मूल्य कसे निर्धारित केले जाते?

ज्वेलरी किंवा स्टॉक्स सारख्या हस्तांतरणीय भेटवस्तू म्हणून मिळाल्यास, त्यांचे मूल्य बाजार दराच्या आधारे निर्धारित केले जाते. जमीन आणि इमारती यांसारख्या स्थायी मालमत्तेच्या बाबतीत, सरकार-निर्धारित मुद्रांक शुल्क मूल्य हे मापदंड आहे. भेटवस्तू म्हणजे फक्त त्या वस्तूच असतात. ज्या तुम्हाला विनामूल्य मिळतात. तुम्हाला त्याच्या मूल्यापेक्षा कमी किमतीत एखादी वस्तू मिळाल्यास, ती देखील टॅक्स पर्पजनुसार भेटवस्तू मानली जाते.

अशा स्थितीत भेटवस्तुंचे मूल्य आणि तुम्ही टॅक्स विवरणपत्रात नमूद केलेले मूल्य यांच्यातील फरक 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला टॅक्सपेअरला त्यांचे देय देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर तुमचा मित्र तुम्हाला 2 लाख रुपये किमतीची सोन्याची चैन देत असेल आणि तुम्ही त्याला फक्त 1.25 लाख रुपये देत असाल तर तुम्हाला उरलेल्या 75 हजार रुपयांच्या फरकावर टॅक्स भरावा लागेल. कारण ही रक्कम दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे.