Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

DMART: डीमार्टला महागाईची झळ, शेअर कोसळले

DMART

Image Source : www.dmartindia.com

वीकेंडच्या निकालानंतर, एव्हेन्यू सुपरमार्ट्सचा स्टॉक (DMart share) सोमवारी बाजाराला सामोरे जाऊ शकला नाही आणि पाहता पाहता तो जवळजवळ 6% नी घसरला आणि गेल्या 6 महिन्यांतील नीचांकी पातळीवर गेला.

वीकेंडच्या निकालानंतर, एव्हेन्यू सुपरमार्ट्सचा स्टॉक (DMart share) सोमवारी बाजाराला सामोरे जाऊ शकला नाही आणि पाहता पाहता तो जवळजवळ 6% नी घसरला आणि गेल्या 6 महिन्यांतील नीचांकी पातळीवर गेला. 3645 रुपयांच्या इंट्राडे नीचांकी पातळीला स्पर्श केल्यानंतर, तो जवळपास 5% घसरून शेवटी 3680 रुपयांवर बंद झाला. बाजारातील जाणकारांनी त्याची घसरण होण्याची भीती आधीच व्यक्त केली असली तरी ही घसरण एवढ्या वेगाने होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. एव्हेन्यू सुपरमार्ट्स ही देशातील एक प्रसिद्ध रिटेल कंपनी आहे, जी DMart नावाने सुपरमार्केट चेन चालवते. 2002 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी महाराष्ट्र आणि गुजरातसह देशातील 12 राज्यांमध्ये 302 ठिकाणी पोहोचली आहे. डिसेंबरच्या तिमाहीतच, कंपनीने 4 नवीन स्टोअर्स उघडली आहेत आणि एप्रिल-डिसेंबरमध्ये म्हणजेच गेल्या 9 महिन्यांत एकूण 22 नवीन स्टोअर्स उघडली आहेत.

DMART शेअर दर महिन्याला घसरत आहे

मात्र, वेगाने विस्तारणार्‍या या कंपनीचा शेअर गेल्या एका वर्षात 16% ने तर ऑक्टोबर 2021 मध्ये रु. 5900 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केल्यानंतर, सुमारे 37% ने घसरला आहे. हा स्टॉक फक्त डिसेंबर तिमाहीत सुमारे 25% नी घसरला आहे. जर तुम्ही चार्टवर नजर टाकली तर, गेल्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सतत घसरणीनंतर डिसेंबरमध्ये सुमारे 1% रिकव्हरी झाली. पण या महिन्यात पुन्हा स्टॉक 10% ने घसरला आहे. जी जून 2022 नंतरची सर्वात मोठी मासिक घट आहे. तसे, या महिन्यात अजून 2 आठवडे बाकी आहेत.

डिसेंबर तिमाही निकालामुळे गुंतवणूकदार निराश

अव्हेन्यू सुपरमार्ट्सने डिसेंबर तिमाहीत रु. 590 कोटी नफा कमावला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 7% जास्त आहे. पण एवढा नफा बाजाराला आवडला नाही, कारण बाजाराला ६५७ कोटी रुपयांचा नफा अपेक्षित होता. अर्थात, 11,569 कोटी रुपयांचे उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 25% अधिक असल्याचा अंदाज आहे. परंतु उत्पन्नाचे आकडे अपेक्षित नफा मिळवू शकले नाहीत. कारण कंपनीच्या कामकाजावरील खर्चाचा दबाव वाढल्याने मार्जिन 9.4% वरून 8.3% पर्यंत घसरला. तर बाजाराला 9% मार्जिनची अपेक्षा होती. हे लक्षात घेण्यासारखे आहे की डिसेंबर तिमाहीत, कंपनीने एकूण 10,484 कोटी रुपये खर्च केले, जे सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत 9% अधिक आहे आणि गेल्या वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 26% अधिक आहे.

GM&A विभागामुळे मार्जिनवर दबाव वाढला

GM&A विभाग म्हणजे जनरल मर्केंटाइल अँड अपॅरल कॅटेगरी. Dmart च्या मार्जिनमध्ये या विभागाचे सर्वाधिक 20% योगदान आहे. या कॅटेगरीमधील तृणधान्ये, कडधान्ये, मैदा, बेसन, रवा आणि कपड्यांच्या किमती गेल्या वर्षभरात लक्षणीय वाढल्या आहेत. तर कंपनीचे बिझनेस मॉडेल सवलत देऊन सर्वाधिक व्हॉल्यूम निर्माण करणे आहे. जर आपण अन्न मंत्रालयाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर डिसेंबर तिमाहीत डाळी, गहू, मैदा आणि तांदूळ यांच्या किमती एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 25-50% वाढल्या आहेत. त्याचबरोबर कापसाचे दर वाढल्याने कपड्यांचे दरही वाढले आहेत. यासह, डिस्क्रिशनरी आयटम, म्हणजे अनावश्यक वस्तूंची विक्री कमी झाल्यामुळे, मार्जिनवर सर्वांगीण दबाव निर्माण झाला आहे.