शेअर बाजारात डिव्हींडड देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला नेहमीच तज्ज्ञांकडून दिला जातो. मागील काही वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या तोडीस तोड खासगी कंपन्या देखील डिव्हीडंडचे वाटप करत असल्याचे दिसून आले आहे. नफ्यातला काही लाभ गुंतवणूकदारांना वाटणाऱ्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. सर्वाधिक डिव्हीडंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये मेटल इंडस्ट्रीजमधील वेदांता, हिंदुस्थान झिंक या कंपन्या आघाडीवर आहे.
बिलेनिअर उद्योजक अनिल अगरवाल यांच्या वेदांता लिमिटेड या कंपनीने गुंतवणूकदारांना वर्ष 2023-2023 मध्ये 29.45% जबरदस्त डिव्हींडड दिला आहे. वेदांताने जुलै 2001 पासून 39 वेळा गुंतवणूकदारांना लाभांश वाटप केले आहे. मेटल उद्योगातील आणखी एक कंपनी हिंदुस्थान झिंकने देखील सरत्या आर्थिक 25.76% डिव्हींडड दिला आहे. वर्ष 2022-2023 मध्ये हिंदुस्थान झिंकने प्रती शेअर 75 रुपयांचा लाभांश जाहीर करत गुंतवणूकदारांना मालामाल केले.
कोळसा उत्पादनातील सरकारी कंपनी कोल इंडिया ही डिव्हींडडच्या बाबतीत सर्वात लोकप्रिय कंपनी ठरली आहे. कोल इंडियाने 2011 पासून 23 वेळा लांभाश वाटप केले आहे. मागील वर्षभरात कोल इंडियाने प्रती शेअर 23.25 रुपयांचा डिव्हीडंड जाहीर केला. सध्या शेअरचा बाजार भाव पाहिला तर कोल इंडियाने सरासरी 11% डिव्हीडंड दिला आहे. आरईसी लिमिटेड या कंपनीने वर्षभरात आतापर्यंत प्रती शेअर 11.30% डिव्हीडंड दिला आहे. गुंतवणूकदारांना प्रती शेअर 13.05 रुपये लाभांश मिळाला. तेल आणि वायू क्षेत्रातील ऑइल अॅंड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ही सरकारी कंपनी डिव्हींडड देण्यात मागे नाही. कंपनीने वर्ष 2000 पासून तब्बल 54 वेळा डिव्हींडंड जाहीर केला आहे. मागील 12 महिन्यात ओएनजीसीने 14 रुपयांचा डिव्हींडड दिला. प्रती शेअर हे प्रमाण 9.24% इतके आहे.
चालू आठवड्यात वेदांताचा स्टॉक एक्स डिव्हींडड होणार आहे. वेदांता पाचवा डिव्हींडड देणार आहे. वेदांताच्या शेअरच्या दर्शनी मूल्याच्या प्रमाणात डिव्हीडंड हा 2050% इतका असेल. लाभांशसाठी कंपनीने 7 एप्रिल 2023 ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे. तर एक्स डिव्हींडडसाठी 6 एप्रिल 2023 ही तारिख असेल. फेब्रुवारी 2023 मध्ये वेदांताने 12.50 रुपये प्रती शेअर लाभांश दिला होता.