क्रिसिल लिमिटेडच्या (CRISIL Ltd) संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत लाभांश देण्याचा हा निर्णय घेण्यात आला. यावेळी कंपनीच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला. आता झालेल्या आर्थिक वर्षातल्या जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. यात कंपनीच्या उत्पन्नात वाढ पाहायला मिळाली. मार्च 2023च्या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित उत्पन्नात जवळपास 19 टक्के (YoY) वाढ झालीय. झी बिझनेसनं हे वृत्त दिलंय. परताव्याशिवाय किरकोळ गुंतवणूकदार हा शेअर बाजारातल्या लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो तसंच इतर अनेक मार्गांनी उत्पन्न मिळवत असतो.
गुंतवणूकदारांना 7 रुपये प्रति इक्विटी शेअर अंतरिम लाभांश
कंपन्या तिमाही निकालांच्या दरम्यान साधारणपणे कॉर्पोरेट्सची घोषणा करतात. यामध्ये बोनस शेअर, स्टॉक स्प्लिट आणि डिव्हिडंडची घोषणा यांचाही समावेश आहे. लाभांशामध्ये कंपन्या अंतरिम लाभांश/विशेष लाभांश देतात. लाभांश दरम्यान, गुंतवणूकदार अतिरिक्त नफा कमावतात. क्रिसिल लिमिटेड या कंपनीनं आर्थिक वर्ष 2022-23 या कालावधीसाठी गुंतवणूकदारांना 7 रुपये प्रति इक्विटी शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. कंपनीच्या शेअरचं दर्शनी मूल्य 1 रुपया होतं. अशा प्रकारे गुंतवणूकदारांना 700 टक्के अंतरिम लाभांश उत्पन्न मिळेल.
लाभांश जाहीर झाल्यानंतर समभाग घसरला
एकूणच या कामगिरीविषयी क्रिसिलनं स्टॉक मार्केटला माहिती दिली. अंतरिम लाभांशाची एक्स-डेट, रेकॉर्ड डेट 4 मे 2023 आहे. तर, प्रत्यक्ष पेमेंटची तारीख 18 मे 2023 आहे. अंतरिम लाभांश आणि निकाल जाहीर झाल्याच्या नंतर कंपनीचा समभाग जवळपास 3.5 टक्क्यांहून अधिक प्रमाणात घसरला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) कंपनीचे मार्केट कॅप 24,797 कोटी रुपये इतके आहे.
कंपनीची एकूण कामगिरी
आर्थिक वर्षाच्या शेवटी कंपनीचं एकत्रित उत्पन्न वाढलं. 31 मार्च 2023ला संपलेल्या तिमाहीत क्रिसिल लिमिटेडचं एकत्रित एकूण उत्पन्न 19.1 टक्क्यांनी वाढून 732.2 कोटी रुपये इतकं झालं. मागील वर्षी याच तिमाहीत ते 614.1 कोटी रुपये इतकं होतं. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न 20.2 टक्क्यानं वाढून ते 615.1 कोटी रुपयांवरून 714.9 कोटी झालं. जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 19.8 टक्क्यांनी वाढून 145.8 कोटी रुपये झाला. मागच्या वर्षी याच कालावधीत तो 121.6 कोटी रुपये होता.
(टीप : शेअर बाजारातली गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. 'महामनी' अशा कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)