Xiaomi या ब्रांडचे भारतात करोडो चाहते आहेत. मूळ चीनी कंपनी असलेली Xiaomi कंपनी देशात स्मार्टफोन, ऑडीओ प्रॉडक्ट, स्मार्टटीव्ही व इतर उपकरणे विकते. भारतातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठी बाजारपेठ लक्षात घेऊन मोठमोठ्या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही ना काही सवलत देत असतात. अशीच एक दमदार सवलत, धमाकेदार ऑफर घेऊन आली आहे झाओमी ही कंपनी.
जर तुम्ही बेस्ट फीचर्सवाला एखादा नवाकोरा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल आणि बेस्ट ऑप्शन शोधत असाल तर मग ही ऑफर जाणून घ्याच.
Xiaomi च्या अधिकृत वेबसाइटवर, म्हणजेच mi.com वर सध्या एक फाडू ऑफर सुरु आहे. झाओमीने देऊ केलेल्या या ऑफरमध्ये 35,999 रुपये किमतीचा Redmi K50i 5G स्मार्टफोन 12,000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करू शकता. म्हणजेच थेट 23,999 रुपयांत तुम्हाला हा फोन खरेदी करता येणार आहे. थांबा, ऑफर इथेच संपलेली नाही.
Rocket? Jitna Tez, #RedmiK50i
— Sumit Sonal (@sumitsonal) July 24, 2022
Banger of a track to start your Sunday. Live Extreme Anthem feat. @BrodhaV is here to celebrate the most extreme smartphone launch of the year - #RedmiK50i 5G.
Kudos to the entire Redmi team behind this project led by @sandeep_ks @RoyNeelanjan pic.twitter.com/9iiMF0ux3h
8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनवर तुम्हाला आणखी सवलती मिळू शकतात. आता या 12,000 रुपयांचा FLAT OFF मिळवल्यानंतर देखील जर तुमच्याकडे ICICI बँक कार्ड्स असेल तर तुम्हाला अतिरिक्त 1,500 रुपयांची सूट मिळू शकते. म्हणजेच तुम्हाला एकूण 13,500 रुपयांपर्यंत खरेदीवर सूट मिळू शकते. थांबा, अजून धीर धरा, आम्ही या मोबाईल खरेदीवर ऑफर मिळवण्यासाठी आणखी एक पर्याय सांगणार आहोत. हा पर्याय आहे मोबाईल एक्सचेंजचा.
Xiaomi किंवा Redmi चा जुना फोन एक्सचेंज ऑफरमध्ये दिल्यास तुम्हाला 2 हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त फायदा मिळू शकतो. म्हणजेच मोबाईल एक्सचेंज ऑफरचा फायदा घेतल्यास तुम्हाला Redmi K50i 5G स्मार्टफोन खरेदीवर 15,500 रुपयांची धमाकेदार सूट मिळणार आहे.
खास फीचर्स जाणून घ्या
Redmi K50i 5G हा खास स्मार्टफोन 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह तुम्हाला खरेदी करता येणार आहे. यामध्ये कंपनी MediaTek Dimensity 8100 चिपसेट देत आहे, ज्यामुळे मोबाईल वापरताना पॉवरची चिंता करण्याची गरज नाही. गेमिंग प्रेमींसाठी हा फोन फायदेशीर ठरू शकतो. फोनचा डिस्प्ले देखील या फोनचे एक भारी स्पेसिफिकेशन म्हणावे लागेल, या फोनचा डिस्प्ले 2460x1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह दिला गेला आहे आणि त्याचा आकार 6.6 इंच इतका आहे. डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश रेट आणि 240Hz च्या टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करणारा आहे हे विशेष. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देखील देत आहे.
जर तुम्ही फोटोग्राफीचे शौकीन आहात तर रिअर साईडला एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि 64-मेगापिक्सेल प्राइमरी लेन्ससह मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. तुम्हाला जर चांगले सेल्फी फोटोज आणि व्हिडियो काढायची हौस असेल तर मग चिंता करायची गरज नाही. या मोबाईलमध्ये 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमधील बॅटरी 5080mAh ची असून ती 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.लॉंग लास्टिंग चार्जिंगचा अनुभव देखील यानिमित्ताने तुम्हाला घेता येईल.
चला तर मग, वाट कसली बघताय? STOCK संपायच्या आता लवकरात लवकर तुमचा स्मार्टफोन बुक करा आणि 35,999 रुपये किमतीच्या Redmi K50i 5G स्मार्टफोनवर 15,500 पर्यंतची सूट मिळवा.