Best Car Discount Offer: गणेशोत्सवानिमित्त अनेक कार डिलर्सनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या कार्सवर वेगवेगळ्या ऑफर्स ग्राहकांसाठी आणल्या आहेत. यामध्ये काही कंपन्यांच्या कारवर किमान टोकन अमाउंटमध्ये गाडीची डिलेव्हरी दिला जात आहे. तर काही कंपन्या एक्चेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट देत आहेत. तर आज आपण निवडक कार कपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या ऑफर्स पाहणार आहोत.
Table of contents [Show]
मारुती (Maruti)
मारुती कंपनीच्या कार्स भारतात सर्वाधिक विकल्या जातात. त्यामुळे भारतातील सणासुदींच्या काळात मारुती कंपनीकडून वेगवेगळ्या मॉडेलवर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. यामध्ये मारुती कंपनीच्या कारच्या मूळ किमतीवर गणेशोत्सवानिमित्त 35 हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्याचबरोबर त्यासोबत 15 हजारांची एक्सचेंज ऑफर आणि तर काही ठराविक कारवर 10 हजारांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. सूट मिळणाऱ्या कार्समध्ये मारुती इग्नस, मारुती बॅलेनो झेटा-सिग्मा, मारुती बॅलेनो सीएनजी, मारुती सियाज, मारुती जिम्मी, मारुती ग्रॅण्ड वितारा या मॉडेल्सचा समावेश आहे.
होंडा कार (Honda Car)
होंडा कंपनीकडूनही गणेशोत्सवानिमित्त 2 ते 3 मॉडेलवर डिस्काउंट दिला जात आहे. होंडा सिटी (पेट्रोल) कारवर 10 हजार रुपयांच्या कॅश डिस्काउंटसह 10 हजारांची एक्सचेंज ऑफर, 8 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. होंडा टू होंडा एक्सचेंज ऑफरमध्ये ग्राहकांना 20 हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. होंडा सिटीच्यी eHEV Hybrid मॉडेलवर जवळपास 1 लाखाचा डिस्काउंट दिला जात आहे. या कारवर कॅश डिस्काउंट आणि डिस्काउंट बोनस सुद्धा दिला जात आहे.
टाटा मोटर्स (TATA Motors)
टाटा कंपनीच्या वेगवेगळ्या मॉडेल्सना भारतात भरपूर मागणी असते. यानिमित्ताने टाटा कंपनीकडूनही सणांनिमित्त खरेदीदारांना वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातात. मागील महिन्यात टाटाने ओनम सणानिमित्त आपल्या वेगवेगळ्या मॉडेल्सवर 25 हजारांपासून 80 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही ही सवलत मिळत आहे.
एसयूव्ही कार्स (SUV Cars)
सणासुदींच्या काळात एसयुव्ही कारसाठी मोठी मागणी असते. अशावेळी संपूर्ण कुटुंबासाठी कार घेणारे अनेक ग्राहक असतात. अशा ग्राहकांसाठी एसयूव्ही कारवरही डिस्काउंट दिला जात आहे. डिस्काउंट मिळत असलेल्या कार्समध्ये Hyundai Kona EV, Citroen C5 Aircross, VW Taigun 1.5 TSI, MG Astor, TATA Safari आणि Nissan Magnite यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या एसयूव्ही कार्सवर 60 हजारांपासून ते 2 लाखांपर्यंतच डिस्काउंट दिला जात आहे.