Malabar Hill Favorite Place Many Luxury Families: बारवाले सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक (Director) राजेंद्र बारवाले यांनी त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांसह मुंबईतील मलबार हिल येथे सुमारे 122 कोटी रुपयांना एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. मलबार हिल हा देशातील सर्वात महागडा निवासी परिसर मानला जातो. हा फ्लॅट मलबार पॅलेसेस(Malabar Palaces) प्रकल्पा अंतर्गत वाळकेश्वर रोड, मलबार हिल्सवर आहे. हा प्रकल्प मॅक्रोटेक डेव्हलपर्सने विकसित केला आहे. मॅक्रोटेक डेव्हलपर्सला लोढा ग्रुप (Lodha Group) म्हणूनही ओळखले जाते.
Table of contents [Show]
7.33 कोटी रुपये मुद्रांक शुल्क
राजेंद्र बारवाले यांनी घेतलेल्या फ्लॅटचा कार्पेट एरिया 9546 चौरस फूट आहे. यामध्येच बाल्कनी, मुख्य दरवाजा पुढील जागा आणि टेरेसचा देखील समावेश आहे. अपार्टमेंटमध्ये सहा ठिकाणी पार्किंगची जागा उपलब्ध करण्यात आली आहे. या सदनिकेची नोंदणी 30 जून 2023 रोजी झाली होती आणि त्यासाठी राजेंद्र बारवाले यांनी 7.33 कोटी रुपये मुद्रांक शुल्कही (Stamp Duty) भरले होते.
पुनर्विकासाचा लक्झरी प्रकल्प
मलबार पॅलेसेस हा पुनर्विकासाचा लक्झरी प्रकल्प आहे. त्याअंतर्गत जुन्या इमारती पाडून नवीन इमारती बांधल्या जात आहेत. लोढा ग्रुपने नुकताच हा प्रकल्प सुरू केला. या इमारतीत एकूण 31 मजले आहेत आणि या इमारतीचे संपूर्ण बांधकाम 30 जून 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
यांनीही केलेत येथे फ्लॅट खरेदी
मुंबईतील मलबार हिलमध्ये आलिशान अपार्टमेंटची मागणी वाढताना दिसत आहे. जूनमध्ये 'कंदोई फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड' या पॅकेजिंग फॅब्रिक आणि बॅग बनवणाऱ्या कंपनीच्या संचालकांनी 109 कोटी रुपयांना लक्झरी प्रोजेक्टमध्ये दोन अपार्टमेंट्स खरेदी केले. यापैकी एक अपार्टमेंट 11 व्या मजल्यावर आहे, ज्याचे एकूण क्षेत्रफळ 4,643 चौरस फूट आहे आणि त्याची किंमत 54.26 कोटी रुपये आहे. दुस-या फ्लॅटचा आकारही तितकाच आहे आणि त्याची किंमतही तेवढीच आहे, पण तो बाराव्या मजल्यावर आहे.
याआधी मार्चमध्ये कंदोई फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन संचालकांनी 4 सी-फेसिंग आलिशान अपार्टमेंट्स खरेदी केल्या होत्या. या प्रत्येक अपार्टमेंटचे क्षेत्रफळ 4,643 स्क्वेअर फूट असून त्याची किंमत 54.26 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
नीरज बजाज आणि जेपी तापडिया
तर मार्च महिन्यातच बजाज ऑटोचे चेअरमन नीरज बजाज यांनी मॅक्रोटेक डेव्हलपर्सकडून 252.5 कोटी रुपयांना त्याच कॉम्प्लेक्समध्ये सी-फेसिंग तीन मजली अपार्टमेंट विकत घेतले. दुसरीकडे, 29 मार्च रोजी उद्योगपती जेपी तापडिया यांच्या कुटुंबीयांनी या प्रकल्पात सुमारे 369 कोटी रुपयांच्या 6 मालमत्ता खरेदी केल्या. 26, 27 आणि 28 व्या माळ्यावर असलेले, हे सर्व फ्लॅट समुद्राभिमुख आहेत आणि त्यांचे एकूण क्षेत्रफळ 27,160.6 चौरस फूट आहे.