RBI ने नुकतेच लाँच केलेले सेंट्रल बँक डिजिटल चलन (CBDC) किंवा eRupee सध्या रोखीत रूपांतरित केले जाऊ शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे रोख रक्कम देखील eRupee मध्ये रूपांतरित करता येणार नाहीये.फक्त बँक ठेवींवर भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) eRupee जारी करते. भविष्यात डिजिटल चलनाचे रोखीत रूपांतर करण्यास RBI अनुमती देईल असा अंदाज वर्तवला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इंडियन मर्चंट्स चेंबरमध्ये (Indian Merchant Chamber) एका कार्यक्रमाला संबोधित करताना, RBI चे मुख्य सीजीएम, अनुज रंजन म्हणाले की पायलट प्रोजेक्टमध्ये निवडक वापरकर्त्यांनी डिजिटल चलन सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे आणि आम्ही वापरकर्त्यांची संख्या वाढवली आहे.
रंजन म्हणाले की, eRupee शी संबंधित खर्च केंद्रीय बँक उचलणार आहे कारण तो RBI च्या दायित्वांचा एक भाग आहे.
येस बँकेसारख्या कर्जदारांचे डिजिटल वॉलेट (Digital wallet) आता Apple ऍप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली. रिलायन्स रिटेल, नॅचरल आईस्क्रीम आणि तेल विपणन कंपन्यांसह अनेक कंपन्यांनी eRupee मध्ये पेमेंट स्वीकारण्यासाठी RBI सोबत साइन अप केले आहे असे देखील त्यांनी सांगितले.
CBDC म्हणजे काय?
सीबीडीसी ही चलनात असलेल्या पैशांसारखीच एक कायदेशीर चलन आहे. डिजिटल चलनाच्या बदल्यात, RBI तुम्हाला पैशांचे व्यवहार करण्यास अनुमती देते. व्यवहारकर्ते अशा स्वरूपाचे चलन कायदेशीररित्या स्वीकारू शकतात. सोप्या भाषेत, तुम्ही डिजिटल चलन म्हणजे डिजिटल नोट/पैसे असे समजू शकता.
eRupee चा पायलट प्रोजेक्ट कुठे सुरू?
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये RBI ने रिटेल मार्केटमध्ये डिजिटल रुपी (CBDC) चा पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता. डिजिटल रूपीचा पायलट प्रोजेक्ट सध्या दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि भुवनेश्वरमध्ये सुरू आहे. मात्र, आता त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. RBI लवकरच अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदौर, कोची, लखनौ, पटना आणि शिमला येथे डिजिटल रूपीची चाचणी सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे.