Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dearness Allowance: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खूशखबर मिळणार, महागाई भत्ता वाढवण्यासाठी सरकारच्या हालचाली

DA

Image Source : www.businessleague.in

Dearness Allowance: दरवर्षी केंद्र सरकारकडून महागाईचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अदा केला जातो. सर्वसाधारणपणे जानेवारी आणि जुलै अशा दोन टप्प्यात महागाईचा आढावा घेऊन महागाई भत्ता निश्चित केला जातो.

केंद्र सरकारकडून लवकरच महागाई भत्ता वाढवला जाण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42% महागाई भत्ता आहे. महागाई भत्ता 45% पर्यंत वाढवण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे केंद्राच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या जवळपास 1 कोटी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे.

अर्थ मंत्रालयाच्या खर्च विषयक विभागाने महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी फॉर्म्युला तयार केला आहे. त्यानुसार केंद्र सरकारचे विद्यमान कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना वाढीव महागाई भत्ता दिला जाईल. याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच तो कॅबिनेटच्या बैठकीत सादर केला जाईल, असे सूत्रांनी म्हटले आहे.

दरवर्षी केंद्र सरकारकडून महागाईचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अदा केला जातो. सर्वसाधारणपणे जानेवारी आणि जुलै अशा दोन टप्प्यात महागाईचा आढावा घेऊन महागाई भत्ता निश्चित केला जातो. आता होणाऱ्या महागाई भत्ता वाढीच्या निर्णयासाठी जून महिन्यातील महागाईची आकडेवारी ग्राह्य धरली जाण्याची शक्यता आहे.

जून महिन्यात महागाईचा दर 3.24% इतका होता. त्यामुळे महागाई भत्ता किमान 3% वाढवला जाण्याची शक्यता आहे. तसचा निर्णय झाला तर त्याची 1 जुलै 2023 पासून अंमलबजावणी केली जाऊ शकते.

महागाई भत्ता वाढ जुलैच्या वेतनात अदा केली जाईल. त्यामुळे केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स असे जवळपास 1 कोटी आजी माजी कर्मचाऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार आहे.

कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला तर अर्थव्यवस्थेला देखील हातभार लागतो. कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती वाढते. त्यामुळे महागाई भत्ता वाढीने मिळालेली अतिरिक्त रक्कम ते खरेदीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी वापरतात. खासकरुन केंद्रीय कर्मचारी, पेन्शनर्स शेअर बाजार, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महागाई भत्त्यात वाढ झाल्यास शेअर बाजारावर परिणाम होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.