सायकल ही भारतातील गरीब आणि कामगार वर्गासाठी स्वस्त आणि मस्त असे वाहन आहे. शारीरिक शक्तीने चालविली जाणारी सायकल वाहतुकीसाठी, व्यायामासाठी आणि खेळासाठी सुद्धा वापरली जाते. सायकलमुळे प्रदूषण ही होत नाही. त्यामुळे सध्या सायकल लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. परिणामी सायकलच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्याचे नुकसान झाले किंवा त्याची चोरी झाली तर नाहक आर्थिक भुर्दंड पडू शकतो. त्यासाठी सायकलचा विमा उतरवणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. विमा काढल्यानंतर सायकलचे अपघाती नुकसान झाले किंवा चोरी झाली तर विमा कंपनीकडून आर्थिक नुकसान भरून मिळते.
काय असतो सायकल विमा (Cycle Insurance)
सायकल चोरीला गेल्यास किंवा अपघातामध्ये सायकलचे नुकसान झाल्यास सायकल विमा धारकाला कंपनीकडून अधिकाधिक रक्कम मिळण्याची तरतूद आहे. सायकल विम्याचा हप्ता हा सायकलच्या किमतीच्या 3 ते 5 टक्के असतो. तसेच सायकल स्वाराला दोन लाख रुपयांपर्यंतचे अपघात विमाकवच मिळते.
सायकल विमा पॉलिसीचे फायदे
जगभरात कव्हरेज : सायकल विमा पॉलिसीवर जगभरात कव्हरेज मिळतो. तुमच्या सायकलचे कुठेही नुकसान झाले तरी तुम्हाला त्यावर विम्याद्वारे आर्थिक साहाय्य मिळते.
आग आणि दंगलीपासून संरक्षण : सायकलचे अपघातामुळे, आगीमुळे किंवा दंगलीमुळे नुकसान झाले तर विमा पॉलिसीद्वारे सायकलचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिक मदत मिळते.
अपघाती मृत्यू लाभ : सायकल अपघातात मृत्यू झाल्यास सायकल विमा पॉलिसीनुसार कुटुंबातील सदस्यांना विम्याची रक्कम आणि सायकल कव्हरेजसाठी पॉलिसीनुसार ठरलेली रक्कम मिळू शकते.
विम्यासाठी नियम व अटी
1. पॉलिसीची कालावधी 1 वर्षाचा असतो.
2. सायकल खरेदी केलेल्या तारखेपासून 1 वर्षापेक्षा जुनी नसावी.