Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Current Bank Account : चालू बँक खात्यातून एका दिवसात किती पैसे काढता येतात?

Current Bank Account

चालू बँक खात्याच्या (Current Bank Account) मदतीने, ग्राहक बँकेला कोणतीही सूचना न देता कधीही व्यवहार करू शकतो. मात्र, यादरम्यान चालू खात्यातून किती पैसे काढता येतील? हेही समजून घेणे आवश्यक आहे.

चालू बँक खाते (Current Bank Account), ज्याला फायनान्शिअल अकाउंट म्हणूनही ओळखले जाते, हे असे खाते आहे जे लोक नियमितपणे मोठ्या मूल्याचे व्यवहार करतात. हे खाते प्रामुख्याने व्यवसायिक जसे की मालक, भागीदारी संस्था, ट्रस्ट, व्यक्तींची संघटना, सार्वजनिक आणि खासगी कंपन्या इत्यादीद्वारे उघडले जातात. चालू बँक खात्याच्या (Current Bank Account) मदतीने, ग्राहक बँकेला कोणतीही सूचना न देता कधीही व्यवहार करू शकतो. मात्र, यादरम्यान चालू खात्यातून किती पैसे काढता येतील? हेही समजून घेणे आवश्यक आहे. कारण, तुम्ही चालू खात्यातून कितीही पैसे काढू शकता परंतु काही अटींसह. चालू खात्याचे काय फायदे आहेत? आणि कोणत्या परिस्थितीत तुम्ही व्यवहार करू शकता? ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चालू बँक खात्याचे फायदे (Advantages of Current Bank Account)

  • त्वरित व्यवसाय व्यवहारांना अनुमती देते
  • पैसे काढण्याची मर्यादा नाही
  • गृह शाखेत (home branch) ठेवींवर मर्यादा नाही
  • चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा पे ऑर्डर वापरून थेट पेमेंट करण्यास व्यापाऱ्यांना सक्षम करते
  • ओव्हरड्राफ्ट सुविधा देते
  • इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा प्रदान करते

चालू खात्यातून पैसे काढण्याच्या अटी

वास्तविक, चालू बँक खात्यातून एका दिवसात किती पैसे काढता येतात हे तुमचे चालू खाते असलेल्या बँकेच्या धोरणांवर आणि या खात्याचा प्रकार काय आहे?  यावर अवलंबून असते
विविध बँका विविध प्रकारच्या चालू खाते सेवा प्रदान करतात, ज्यात स्टँडर्ड करंट अकाउंट, बेसिक करंट अकाउंट, प्रीमियम करंट अकाउंट, पॅकेज्ड करंट अकाउंट आणि फॉरेन करन्सी अकाउंट समाविष्ट आहेत. याशिवाय बँका त्यांच्या सेवा पाहता काही चालू खाती स्वतः सेट करतात. जेवढ्या प्रकारची करंट अकाउंट आहेत, त्यांच्यासाठी बँका स्वतः त्यानुसार त्यांची मर्यादा ठरवतात. उदाहरणार्थ, अॅक्सिस बँकेचे सामान्य चालू खाते (Normal Current Account) त्याच्या ग्राहकांना कोणतेही शुल्क न आकारता 1 लाख रुपये काढण्याची परवानगी देते. या रकमेच्या व्यवहारानंतरही खात्यात पैसे असतील तर ते तुम्ही काढू शकता. पण त्यावर तुम्हाला बँकेने ठरवून दिलेली फी भरावी लागेल. ज्याला 'कॅश हँडलिंग चार्ज' (Cash Handling Charge) म्हणतात. कॅश हँडलिंग चार्ज प्रत्येक बँकेत वेगवेगळे असते.