भारतात मध्यमवर्गीयांची संख्या गेल्याकाही वर्षात वाढली आहे. यासोबतच नवीन गाडी, घर, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा कल वाढल्याने कर्जाची मागणी देखील वाढली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज घेणाऱ्यांमध्ये तरूणांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे भारतातील तरूण कर्जाच्या जाळ्यात अडकत चालला आहे का? अशा प्रश्न निर्माण होतो.
Table of contents [Show]
तरूणवर्ग मोठ्या प्रमाणात करतोय क्रेडिट कार्डचा वापर
Paisabazaar च्या एका रिपोर्टनुसार, सर्वाधिक विशीतील तरूण वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाची मदत घेत आहेत. भारतातील लोक सर्वसाधारणपणे वयाच्या 28व्या वर्षी पहिले क्रेडिट कार्ड घेतात. वयाची 25 वर्ष पूर्ण होण्याआधी क्रेडिट कार्ड घेणाऱ्यांचा आकडा 24 टक्के आहे. तर वैयक्तीक कर्ज काढणाऱ्यांचे सरासरी वय हे 29 वर्ष आहे. तर घर खरेदीसाठी कर्ज काढणाऱ्यांचे सरासरी वय हे 33 वर्ष आहे.
विशेष म्हणजे तरूण वर्ग कर्जाच्याबाबतीत अधिक जागृक असल्याचे देखील दिसून येते. तरूण वर्ग क्रेडिट स्कोर तपासण्यात व कर्जाची परतफेड करण्यात देखील आघाडीवर आहे. तसेच, महिला व पुरूष दोन्हींचा क्रेडिट स्कोर जवळपास समानच असल्याचे आढळून आले.
नोकरी करणाऱ्यांचा क्रेडिट स्कोर चांगला
अभ्यासात, नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा क्रेडिट स्कोर हा व्यवसाय (स्वयंरोजगार) करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक चांगला असल्याचे दिसून आले. 25 टक्क्यांपेक्षा अधिक नोकरी करणाऱ्यांचा क्रेडिट स्कोर हा 770 पेक्षा अधिक होता. या बाबतीत स्वयंरोजगार असणाऱ्या ग्राहकांचा आकडा फक्त 14 टक्के आहे. याचाच अर्थ स्वयंरोजगार असणाऱ्यांच्या तुलनेत नोकरी करणारे अधिक चांगल्या प्रकारे कर्जाची परतफेड करतात. यामुळे बँका देखील नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्ज देताना अधिक प्राधान्य देतात.
गाडी खरेदी करण्यासाठी घेतात कर्ज
तरूणवर्ग नवीन दुचाकी खरेदी करण्यासाठी कमी वयात कर्ज काढत आहेत. सर्वसाधारणपणे वयाच्या 28व्या वर्षी नवीन गाडी खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले जाते. या व्यतिरिक्त क्रेडिट कार्ड, वैयक्तीक कर्ज, गृह कर्ज, सोन्यावरील व इतर वस्तू खरेदीसाठी देखील तरूणवर्गाकडून कर्ज काढले जाते.
गृह कर्जात महिला आघाडीवर
विशेष म्हणजे सर्व कर्जांमध्ये केवळ गृहकर्जाच्या बाबतीत पुरुषांच्या तुलने महिलांची संख्या जास्त आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे महिलांना गृहकर्जाच्या व्याजावर मिळणारी सूट हे आहे. याशिवाय, महिलांच्या नावावर संपत्ती खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटीमध्ये देखील सवलत मिळते.
कर्जाच्या बाबतीत बंगळुरू सर्वोत्तम शहर
रिपोर्टनुसार, बंगळुरू हे कर्जाच्याबाबतीत बंगळुरू सर्वोत्तम शहर ठरले आहे. याचा अर्थ या शहरात कर्जाची उपलब्धता, कर्जाची परतफेड, व्याजदर हे सर्वात चांगले आहे. या यादीमध्ये टॉप-10 शहरांमध्ये मुंबई, पुणे, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकत्ता, सुरत आणि कोइंम्बतूरचा समावेश आहे.