Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit card limit : जास्त मर्यादेचं क्रेडिट कार्ड कसं मिळवायचं

Credit Card Limit

Credit Card : आपल्या वार्षिक स्थिर उत्पन्नानुसार एका ठराविक रकमेपर्यंत खर्च करण्यासाठी बँकेकडून क्रेडिट कार्ड दिलं जातं. या क्रेडिट कार्डची मर्यादा ही आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणानुसार आणि आपल्या क्रेडिट स्कोरप्रमाणे वाढवली जाते.

Credit card limit : आपल्याला अनेकदा अशी खरेदी करायची असते की ज्याच्यासाठी आपण ताबडतोब पैसे देऊ शकत नाही. तेव्हा अशा गोष्टींसाठी कुणाकडून  उधार पैसे घेणं योग्य वाटत नाही.  कधी त्या वस्तुची किंमत एवढी मोठी नसते की बँकेतुन कर्ज घ्यावं. मग करायचं काय तर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बँकेकडूनच उधारीवर पैसे घ्यायचे. आज खिशामध्ये क्रेडिट कार्ड असणं म्हणजे एक स्टेटस सिम्बॉल झालं आहे. त्यातही क्रेडिट कार्डचं लिमीट ही तुमची आर्थिक पत (Financial Status) काय आहे हे सुचित करते.

जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्या कार्डवर घेतलेलं कर्जाचे हफ्ते तुम्ही वेळोवेळी भरले तर साहजिकच तुमचा क्रेडिट स्कोर हा चांगला राहुन तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा सु्द्धा वाढु शकते.

जास्त मर्यादेच्या क्रेडिट कार्डची आवश्यकता का

बँके आपल्या क्रेडिट कार्डची मर्यादा ही आपले उत्पन्न आणि आतापर्यंत भरलेल्या कर्जानुसार, त्या क्रेडिट कार्डवर सुरू असलेली अन्य कर्ज यानुसार मिळालेल्या क्रेडिट स्कोर नुसार ठरवत असते. जर बँकेकडून आपल्याला 60 हजार मर्यादेचं क्रेडिट कार्ड दिलं असेल आणि आपण एखाद्या वस्तुच्या खरेदीसाठी 70 हजार रूपये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च करणार असू तर आपल्याला ओव्हर लिमीटचं इंडिकेशन दिलं जातं. अशा वेळी बँकेकडून वाढीव खर्चावर बँकेकडून परवानगी दिली जाते. मात्र, वाढीव रकमेवर अधिकतर 5 टक्क्यापर्यंतचं व्याज आकारलं जातं. त्यामुळे अधिकतर रकमेच्या क्रेडिट कार्डची सगळ्यांना आवश्यकता भासते.

जास्त मर्यादेचं क्रेडिट कार्ड कसं मिळवायचं

  • जर तुम्ही नोकरी ऐवजी व्यवसाय करत असाल तर स्थिर उत्पन्न नसल्याच्या कारणास्तव तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळणं थोडं अडचणीचं ठरतं. मात्र, अनेक बँका यावरही पर्याय उपलब्ध करुन देतात. आपल्याला ज्या बँकेचं क्रेडिट कार्ड हवं आहे त्या बँकेमध्ये आपण एफडी केल्यास आपल्याला क्रेडिट कर्ड मिळते. जर आपण मोठ्या रकमेची एफडी केली तर आपल्याला त्या रकमेच्या 90 टक्क्यांपर्यतची मर्यादा असलेलं क्रेडिट कार्ड मिळतं.
  • जर तुम्ही नोकरी करत असाल तर ज्या बँकेमध्ये तुमचं सॅलरी अकाउंट आहे त्या बँकेकडून तुम्हाला सहज क्रेडिट कार्ड मिळू शकते. त्यांच्याकडे तुमच्या आर्थिक व्यवहारासंबंधित माहिती असल्याने त्यासाठी काही अडचण येत नाही. या माहितीनुसार बँक  तुम्हाला  विविध ऑफरसह क्रेडिट कार्ड देऊ शकते.
  • बाजारात सुद्धा विविध वित्तसंस्थेचे क्रेडिट कार्डस उपलब्ध आहेत. पैसाबाजार, बँकबाझार, क्रेडिटमंत्री या संकेतस्थळावर जाऊन एकाच प्लेटफॉर्मवर आपण वेगवेगळ्या क्रेडिट कार्ड्सविषयी माहिती घेऊ शकतो. त्यांच्या ऑफर्स तपासुन  आपल्याला जे क्रेडिट कार्ड हवं आहे ते आपण घेऊ शकतो.