prices of vegetables increased: हिवाळा म्हटलं की विविध प्रकारच्या शेंगा, हिरव्या पालेभाज्या या सर्वांची आवक वाढते आणि त्या पोष्टीक (healthy) असल्यामुळे त्याची खरेदी सुद्धा त्याच प्रमाणात होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून दोडके, गवार, काकडी, शेवगा यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे त्याचे दर वाढले आहे, त्यामुळे महिलांनी गाजर, टोमॅटो (Carrots, tomatoes) याची खरेदी करायला सुरवात केली आहे. काही भाज्यांच्या दरात वाढ झाल्याने त्याच्या खरेदीवर परिणाम झाल्याचे किरकोळ विक्रेत्यानी सांगितले आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की.. (Farmers said that..)
काही दिवसांपूर्वी भरपूर आवक असल्याने शेतकऱ्यांना समाधान होईल इतका सुद्धा भाव मिळत नव्हता आणि आता भाव गगनाला भिडले (Prices increased) आहे. भाव कमी असतांना ग्राहक आणि व्यापारी (Consumers and traders) या दोघांना भरपूर फायदा झाला होता. काकडी, शेवगा, गवार, दोडका, भेंडी यांचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांना परवडले नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे, आधी भावात घसरण (Fall in price) आणि आता भाव झाली तर खरेदीवर परिणाम अशा दोन्ही बाजूंनी शेतकरी गजबजला गेला आहे.
विविध भाज्यांचे दर (Rates of various vegetables)
सध्या महिलांचा कल गाजर आणि मटर याकडे जास्त दिसून येत आहे कारण त्याचे दर आवाक्यात आहे. गाजर आणि मटर हे दोन्ही 30 ते 40 रुपये किलो आहे. भेंडी आणि कारल्याचे भाव अजूनही गगनाला भिडले आहेत. भिंडी 100 रुपये किलो झालेली आहे. भाजी बाजारात बटाटे 20 रुपये, टोमॅटो 30 रुपये, कांदा 30 रुपये, वांगी 30 रुपये, कोबी 20 , वाटाणे 40, गाजर 30 , फ्लॉवर 30 रुपये, हिरव्या भाज्या, पालक, मेथी 30 रुपये किलोने मिळतात.
ग्राहक आणि विक्रेत्यानचे म्हणणे काय? (What do customers and sellers say?)
शेतकऱ्यांनी घेतलेले पीक बाजारात विकायला आल्यानंतर त्याचे दर हे ग्राहकाला विक्रेत्याला आणि शेतकऱ्याला (Consumers Vendors and Farmers) परवडेल असे असायला हवे. दर जास्त असेल तर ग्राहक खरेदी कमी करणार आणि ग्राहकांनी खरेदी केली नाही तर हवा तेवढा सुद्धा भाव त्या मालाला मिळणार नाही. काही भाज्यांचे दर महाग असतील तरीही थोडी का होईना ग्राहक खरेदी करतील पण एका सोबत अनेक भाज्यांचे दर वाढले तर ग्राहक त्यावर पर्याय निवडून दूसरा मार्ग शोधतील आणि मग सोबत सगळ्यांचे नुकसान होईल.