• 24 Sep, 2023 03:01

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Real Estate Investment Plan: रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याआधी हे घटक विचारात घ्या, होईल फायदा

Real Estate Investment Plan

मागील काही वर्षात रियल इस्टेटचे भाव गगणाला भिडलेले पाहायला मिळत आहे. तसेच, या सेक्टरमध्ये कोव्हिडनंतर ही वाढ झपाट्याने झाली. त्यामुळे आता प्रत्येकजण या क्षेत्रात गुंतवणूक करायला उतरू पाहत आहेत. पण, त्याआधी आपल्याला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपण महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

गुंतवणूक आली की रिस्क आली त्यामुळे ती कमी करायची असल्यास त्याआधी ज्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहोत. त्याविषयी माहिती काढणे आणि रिसर्च करणे आवश्यक ठरते. आता रियल इस्टेट सेक्टरमध्ये खूप नफा असला तरी मालमत्ता घेण्याआधी त्याविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. 

जसे की रियल इस्टेटमध्ये कमर्शियल, रेसिडेंशियल, इंडस्ट्रीयल आणि जमीन असे काही प्रकार आहेत. त्यामुळे या बाबींविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. तसेच, यात गुंतवणूक करण्याआधी आपल्याला काही महत्वाचे घटक जाणून घेणे देखील आवश्यक आहे.

योग्य लोकेशन निवडा

रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची म्हटल्यावर आपल्याला योग्य लोकेशन निवडणे महत्वाचे ठरते. कारण, लोकेशन हा तुमच्या मालमत्तेवर महत्वाचा प्रभाव टाकते. तसेच, यावरुन तुमच्या मालमत्तेच्या रकमेचे मूल्य ही ठरते. समजा तुम्ही चांगल्या क्षेत्रात मालमत्ता घेत असल्यास तिथे तिची किंमत जास्त असू शकते. 

मात्र, ज्या क्षेत्रात तुम्हाला मालमत्ता घ्यायची नसेल तेथे किंमत कमी असू शकते. त्यामुळे बिल्डर मालमत्तेचे मूल्य ठरवताना या गोष्टींची तुलना करु शकतो. यासाठी मालमत्ता घेताना, लोकेशन पाहून त्याची रक्कम तुम्हाला द्यावी लागू शकते.

तुमच्या ध्येयांनुसार प्लॅन बनवा

महत्वाची स्टेप झाल्यानंतर तुमचे गुंतवणुकीचे ध्येय ठरवणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला गुंतवणुकीतून ताबडतोब नफा पाहिजे की दीर्घ काळ रेंटमधून स्थिर उत्पन्न मिळवायचे आहे? हे ठरवणे आवश्यक आहे.  म्हणूनच तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि रिस्क घेण्याची तयारी निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच, चांगला निर्णय घेण्याची आणि गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करण्याची तुमची क्षमता तेव्हाच योग्य ठरु शकते. जेव्हा तुम्ही तुमच्या गुंतवणुकींच्या ध्येयांवर काम कराल.

फायनान्शियल प्लॅन आवश्यक

या क्षेत्रात गुंतवणूक करण्याआधी पैशांचा बजेट बसवणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही किती पैसे गुंतवू शकता हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तसेच, गुंतवणूक करताना पैशांचा फ्लो कसा ठेवावा लागेल, याचा ही प्लॅन तुमच्याजवळ असायला हवा. त्यामुळे पैशांचे पूर्ण प्लॅनिंग करुन तुम्ही या क्षेत्रात उतरल्यास तुम्हाला पुढे जास्त अडचणी येणार नाही. यासाठी तुम्ही एखाद्या जाणकारीची मदत देखील घेऊ शकता.

रियल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी धोरण हवे

रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याआधी गुंतवणुकीचे ठोस धोरण बनवणे आवश्यक आहे. यामध्ये गुंतवणुकीचे उद्दिष्टे, रिस्क आणि उपलब्ध संसाधनांचा विचार व्हायला पाहिजे. तसेच, मार्केटचा सध्याचा कल आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करणे ही आवश्यक आहे.

मार्गदर्शन घेणे गरजेचे

रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे रिस्की असू शकते. त्यामुळे रिस्क कमी करण्यासाठी काही महत्वाची पावले उचलणे आवश्यक आहे. त्यामुळे यासाठी या क्षेत्रातील एखाद्या जाणकाराचा सल्ला घेणे फायद्याचे ठरु शकते. कारण, हे क्षेत्र दिसायला सोपे असले तरी बरेच गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे जाणकाराचे मार्गदशर्न घेणे तुमच्यासाठी लाभदायी ठरु शकते.    

सुरुवात छोटी करा

जर तुम्ही या क्षेत्रात नवीनच उतरू पाहत असल्यास एक किंवा दोनच मालमत्ता घ्या. त्यामुळे तुम्हाला संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते. तसेच, त्यातून अनुभव घेऊन पुढे जोमाने या क्षेत्रात ठसा उमटवता येऊ शकतो.

आता या क्षेत्रात गुंतवणूक करण्याआधी या गोष्टी तुम्हाला नक्कीच कामी येणार आहेत. तसेच, कोणत्या प्रकारात गुंतवणूक करायची आहे. हे देखील तुम्हाला ठरवावे लागणार आहे. कारण, त्यानुसार तुम्हाला या क्षेत्रात चांगला रिटर्न मिळवता येणार आहे.