Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cleartrip Premium Getaways: क्लिअरट्रिपकडून पर्यटकांसाठी ‘प्रीमियम गेटवेज’ची सेवा, जाणून घ्या सविस्तर

Cleartrip

Cleartrip Premium Getaways: हॉटेल व्‍यवसायाला प्रबळ करण्‍याच्‍या प्रयत्‍नात क्लिअरट्रिप या फ्लिपकार्ट कंपनीने अद्वितीय लक्‍झरी प्रवास अनुभव देणाऱ्या प्रीमियम गेटवेज (Premium Getaways)चे अनावरण केले. सध्‍या ही सेवा २५ हून अधिक ठिकाणी असलेल्‍या ४० हून अधिक हॉटेल्‍ससोबतच्‍या सहयोगाने सुरु केली आहे.

हॉटेल व्‍यवसायाला प्रबळ करण्‍याच्‍या प्रयत्‍नात क्लिअरट्रिप या फ्लिपकार्ट कंपनीने अद्वितीय लक्‍झरी प्रवास अनुभव देणाऱ्या प्रीमियम गेटवेज (Premium Getaways)चे अनावरण केले. सध्‍या ही सेवा २५ हून अधिक ठिकाणी असलेल्‍या ४० हून अधिक हॉटेल्‍ससोबतच्‍या सहयोगाने सादर करण्‍यात आली आहे. पुढील ६ महिन्‍यांमध्‍ये सर्व प्रमुख पर्यटन स्‍थळांना व्‍यापून घेणाऱ्या ५०० हून अधिक हॉटेल्‍सचा समावेश करण्‍यात येईल. हॉलिडे पॅकेजेसचे हे हँडपिक केलेले सूट्स अत्‍यंत स्‍पर्धात्‍मक किंमतीत उपलब्‍ध आहेत आणि त्‍यामध्‍ये उच्‍च दर्जाच्‍या सेवांचा समावेश आहे.  

सुविधांपासून लोकेशन्‍सपर्यंत ‘प्रीमियम गेटवेज’अंतर्गत सर्व मालमत्ता क्लिअरट्रिपच्‍या सर्वात मोठ्या वापरकर्तावर्गामधून सर्वसमावेशक बाजारपेठ संशोधन व माहितींच्‍या आधारावर निवडण्‍यात आल्‍या आहेत. काही लोकप्रिय गंतव्‍यांमध्‍ये मनाली, कूर्ग, जयपूर व मुनार या स्‍थळांचा समावेश आहे. पर्यटक या ऑफरिंग्‍जचा लाभ घेऊ शकतात आणि यंदा उन्‍हाळ्यामध्‍ये संस्‍मरणीय ट्रिपचे नियोजन करू शकतात.

कंपनीने एकसंधी युजर अनुभव सक्षम करण्‍यासाठी हॉटेल ऑफरिंग्‍जच्‍या यूआय/यूएक्‍सची परिपूर्ण सुधारणा केली आहे. प्रत्‍येक वैशिष्‍ट्य पर्यटकांना त्‍यांच्‍या बुकिंग प्रवासाच्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍यावर योग्‍य निर्णय घेण्‍यास मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. यामध्‍ये पारदर्शक किंमत (कोणताही लुप्‍त खर्च नाही), उपलब्ध असलेल्‍या व नसलेल्‍या सुविधांचा उल्‍लेख, महागड्या प्रॉपर्टीचे व्हिज्‍युअल्‍स व ग्राहकांचे अभिप्राय यांचा समावेश आहे.

या नवीन विकासाबाबत सांगताना क्लिअरट्रिपच्‍या हॉटेल्‍स अॅण्‍ड अकोमोडेशनचे प्रमुख मनू ससीधरन म्‍हणाले, ‘‘आम्‍ही आमच्‍या हॉटेल श्रेणीसह नवीन प्रवासाची सुरूवात करत असताना ग्राहक अनुभवामध्‍ये वाढ करण्‍यासाठी अभूतपूर्व नाविन्‍यता आणली आहे. आमच्‍या सर्व ऑफरिंग्‍जप्रमाणे आमच्‍या वापरकर्त्‍यांप्रती अणि दर्जाबाबत तडजोड न करता प्रवास सुलभ करण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेमधून ‘प्रीमियम गेटवेज’ लाँच करण्‍यासोबत आमच्‍या व्‍यासपीठावर ‘यूआय/यूएक्‍स’ अपग्रेड करण्‍यात आले आहे. ही सुधारणा व्‍यासपीठाच्‍या ट्रेडमार्क आधारस्‍तंभांना अधिक चालना देईल, ज्‍यामुळे ते अधिक सर्वोत्तम व सुव्‍यवस्थित बनतील.’’

ते पुढे म्‍हणाले, ‘‘महामारीनंतरच्‍या विश्‍वामध्‍ये लक्‍झरी प्रवास बोर्डमधील पर्यटकांसाठी प्रमुख अस्‍पायरेशन म्‍हणून उदयास आले. ‘प्रीमियम गेटवेज’सह आम्‍ही या मागणीची यशस्‍वीपणे पूर्तता करण्‍यास आणि आमच्‍या ग्राहकांना संस्‍मरणीय अनुभव देण्‍यास उत्‍सुक आहोत. आम्‍ही बोर्डमधील पर्यटकांच्‍या इच्‍छांनुसार आमच्‍या ऑफरिंग्‍ज विस्‍तारित करत राहू.’’ नुकतेच कंपनीच्या नेशनऑनव्‍हेकेशन समर सेल मोहिमेदरम्‍यान हॉटेल्‍स बुकिंग्‍जमध्‍ये ३.५ पट वाढीची नोंद केली.