• 24 Sep, 2023 07:02

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cleartrip Axis Bank Partnership : क्लिअर ट्रिपची ॲक्सिस बँकेसोबत भागीदारी; पर्यटकांना होणार फायदा

Cleartrip Axis Bank Partnership  : क्लिअर ट्रिपची ॲक्सिस बँकेसोबत भागीदारी; पर्यटकांना होणार फायदा

फ्लिपकार्टची उपकंपनी क्लिअर ट्रिप ही प्रवाशांना रेल्वे, टॅव्हल्स, विमान प्रवासाचे तिकीट, हॉटेल्स बुकिंगच्या सुविधा उपलब्ध करून देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे. दरम्यान Clear trip ने Axis बँकेसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या माध्यमातून ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना प्रवासी योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही क्लिअर ट्रिपने म्हटले आहे.

पर्यटन आणि प्रवास सुकर आणि सोयीचा करणारी संस्था म्हणून क्लिअर ट्रिप प्रत्येकालाच परिचित आहे. त्यातच आता  क्लिअर ट्रिपने नुकतीच ॲक्सिस बँकेशी भागीदारी केली आहे. त्यामुळे क्लिअर ट्रिपच्या ग्राहकांना आणखी काही सवलतींचा लाभ घेता येणार आहे. क्लिअरट्रिप आणि ॲक्सिस बँकेच्या या भागीदारीचा ग्राहकांना कशाप्रकारे फायदा होणार आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात

क्रेडिट कार्ड धारकांना फायदा-

फ्लिपकार्टची उपकंपनी क्लिअर ट्रिप ही प्रवाशांना रेल्वे, टॅव्हल्स, विमान प्रवासाचे तिकीट, हॉटेल्स बुकिंगच्या सुविधा उपलब्ध करून देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे. दरम्यान Clear trip ने  Axis बँकेसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या माध्यमातून अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना प्रवासी योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही क्लिअर ट्रिपने म्हटले आहे. याचा तब्बल 1 कोटी 25 लाख क्रेडिट कार्ड (credit card) धारकांना फायदा होणार असल्याची माहिती Clear trip कार्यकारी अधिकारी अय्यप्पन आर यांनी दिली आहे.

असा होईल फायदा

अॅक्सिक बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना आता क्लिअर ट्रिपच्या ऑनलाईन बुकिंगच्या सुविधा वापरत असताना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय बुकिंग करता येणार आहे. विमानाचे तिकीट, हॉटेल्स बुकींगवर 30 % पर्यंत सवलत मिळणार आहे. तसेच तिकीट रद्द करणे, प्रवासाच्या तारखेत बदल करणे यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. तसेच अॅक्सिस बँकेचे कार्डधारकांना‘CT FlexMax’ या सुविधेच्या माध्यमातून त्यांच्या विमान प्रवासाचे वेळापत्रक बदलू शकणार आहेत. तसेच त्यांना सीट बुकींगमध्ये 1200 रुपयांपर्यंची सवलत, 500 रुपयांपर्यंतचे जेवण मोफत मिळू शकणार आहे. या सर्व सवलतीसाठी नियम व अटी लागू असू शकतात.

अशा प्रकारे या भागीदारीमुळे ग्राहकांना फायदा होणार आहे. तसेच तुमच्याकडे  Axis बँकेचे कार्ड असेल तर तुम्ही देखील पर्यटनासाठी जात असताना क्लिअरट्रिपच्या माध्यमातून प्लॅनिंग करून तुमच्या पर्यटन खर्चात बचत करू शकणार आहात.