सिट्रोएन (Citroen India) ने आपली इलेक्ट्रिक कार सिट्रोएन ईसी3 (Citroen E-C3) ऑल-इलेक्ट्रिक भारतीय ऑटोमोबाईल बाजारात लॉन्च केली आहे. कंपनीने या कारला अनेक आधुनिक फीचर्सने सुसज्ज केले आहे. दिल्लीत या कारची एक्स-शोरूम किंमत 11,50,000 ठेवण्यात आली आहे. या कारचा कमाल वेग ताशी 320 किलोमीटर आहे. तसेच, या कारमध्ये 100% फास्ट चार्जिंग सुविधेला सपोर्ट करणारे फीचर देण्यात आले आहे. या कारमध्ये ग्राहकांना कार्यक्षम ई-पॉवरट्रेन इंजिन मिळते. या कारबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया
रेंज आणि इंजिनचा कमाल वेग
नवीन इलेक्ट्रिक कार सिट्रोएन ईसी3 (Citroen E-C3) चा कमाल वेग 320 किलोमीटरप्रति तास आहे. तसेच, या कारमध्ये 100% फास्ट चार्जिंग सुविधेला सपोर्टकरणारे फीचर देण्यात आले आहे. या कारमध्ये ग्राहकांना कार्यक्षम ई-पॉवरट्रेन इंजिन मिळते. पूर्णपणे इलेक्ट्रिक असलेली ही कार तिरुवल्लूर, तामिळनाडू येथील उत्पादन केंद्रात तयार करण्यात आली आहे. फेब्रुवारीमध्येच या कारची डिलिव्हरी सुरू झाली होती. ही कार 47 कस्टमायझेशन पर्यायांसह तीन पॅकमध्ये उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये 29.2 kWh LFP बॅटरी असणार आहे, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 320 किमी पर्यंत धावू शकेल. ही इलेक्ट्रिक कार (EV) सिंगल फ्रंट एक्सल-माउंट इलेक्ट्रिक मोटरद्वारे समर्थित आहे, जी 56 बीएचपी (bhp) पॉवर आणि 143 (एनएम) Nm पीक टॉर्क विकसित करते. करते यामुळे गाडीचा टॉप स्पीड 107 किमी प्रतितास आहे. यात रिजनरेटिव्ह ब्रेकिंगसह दोन ड्रायव्हिंग मोड्स, इको आणि स्टँडर्ड देखील मिळतात. इलेक्ट्रिक कारमध्ये ग्राहकांना 13 रंगांचे पर्याय दिसतील.
टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह ही आहेत कारची वैशिष्ट्ये
एलेक्ट्रिक कारमध्ये स्प्लिट हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, 10.2-इंच यात स्प्लिट हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, 10.2-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स आणि चार स्पीकर यांसारखी वैशिष्ट्ये मिळतील. इलेक्ट्रिक कार 4 मॉडेल्समध्ये खरेदी करता येईल . या कारच्या लाइव्ह मॉडेलची किंमत 11.50 लाख रुपये, फील मॉडेलची किंमत 12.13 लाख रुपये, फील (व्हिव्ह पॅक) मॉडेलची किंमत 12.28 लाख रुपये आणि फील (ड्युअल टोन) 12.43 लाख रुपये आहे.
टाटाच्या 'या' दोन कार्सला देईल थेट स्पर्धा
सिट्रोएन ई-सी3 (Citroen eC3) ही सध्याच्या सी3 (C3) हॅचबॅक मॉडेल मधील इलेक्ट्रिक कार आहे, जी 5.98 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 8.25 लाख रुपयांपर्यंत जाते. (ईसी3) EC3 प्रामुख्याने टीयागो ईव्ही (Tiago EV) ही कार प्रतिस्पर्धी आहे. सी3 ही कार भारतीय बाजारपेठेत टाटा पंच देखील टक्कर देणार आहे. सध्या, सिट्रोएन कंपनीचे देशात मोठे नेटवर्क नाही. पण या कंपनीच्या गाड्यांना खूप पसंती दिली जात आहे.