इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये सेमिकंडक्टर आणि चीप हे महत्त्वाचे असते. या पार्टच्या निर्मितीसाठी विशेष तंत्रज्ञानाची आवश्यता आहे. जगभरामध्ये फक्त काही ठराविक देशच मोठ्या प्रमाणात सेमीकंडक्टर आणी चीप निर्मिती करतात. त्यामधील महत्त्वाचा देश म्हणजे चीन. मात्र, मागील काही दिवसांपासून चीनची या क्षेत्रामधील मक्तेदारी कमी होऊ लागली आहे. चीप आणि सेमिकंडक्टर हे इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील महत्त्वाचे भाग असल्याने एकाच देशावर उपलब्धतेसाठी अवलंबून राहू शकत नाही, हे इतही देशांनी ओळखले असून अमेरिका, जपान, भारतातही चीप सेमिकंडक्टर निर्मितीला प्रोत्साहन देण्यता येत आहे.
चीनच्या पिछेहाट का होतेय?
चीनमध्ये मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे त्यांचा आरोग्य आणि वैद्यकीय सेवांवरी खर्चही वाढत आहे. चीनकडून चीप आणि सेमिकंडक्टर निर्मिती उद्योगांना मोठ्या प्रमाणावर सबसिडी देण्यात येते. मात्र, आरोग्यावरील खर्चवाढीमुळे हे अनुदान कमी करण्यात आले आहे. सुमारे १०० बिलियन डॉलरपेक्षा जास्त खर्च कमी करण्यात आला आहे. तसेच मागील काही वर्षांपासून दिलेल्या अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचेही चीन सरकारच्या लक्षात आहे. त्यामुळे या क्षेत्राला देण्यात येणाऱ्या सहकार्यावर चीन पुन्हा एकदा विचार करत आहे.
जागतिक मंदीचा परिणाम
जागतिक मंदीची शक्यता निर्माण झाल्यानेही चीनच्या चीप आणि सेमिकंडक्टर उद्योगावर परिणाम झाला आहे. सोबतच भारत, अमेरिका आणि जपान देशांमध्येही चीप, सेमिकंडक्टर निर्मितीचे प्रकल्प उभे राहत आहेत. हे सुटे पार्ट्स अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे सुरक्षेचाही मुद्दा महत्त्वाचा आहे. भविष्यात या पार्ट्साठी फक्त चीनवर अवलंबून रहायला लागू नये, असा विचार इतर देश करत आहेत. त्यामुळे इतर देशही या तंत्रज्ञानाच्या संशोधनावर काम करत आहेत.
मशिनरी मिळण्यात अडचण
कोरोनाच्या जागतिक लाटे दरम्यान अमेरिका आणि चीनमध्ये चीप, सेमिकंडक्टर उत्पादनावरून स्पर्धा निर्माण झाली होती. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या महत्त्वाच्या सुट्या भागांसाठी फक्त चीनवर अवलंबून राहिल्याने त्याच्या पुरवठा साखळी आणि एकूण उद्योगावर विपरीत परिणाम झाला होता. भारतातही चीपचा तुटवडा भासला होता. त्यामुळे आता चिनी कंपन्यांना चीप निर्मितीसाठी लागणारे डिझाइन सॉफ्टवेअर आणि मशिनरी इतर देशांकडून मिळण्यात अडचणी येत आहेत.