सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे बॅंका त्यांच्या लोनवर बऱ्याच ऑफर देतात. यामध्ये बॅंकाचा जास्त फोकस होम लोन आणि कार लोनवर असतो. कारण, सणासुदीचा काळ म्हणजे चैतन्य आणि प्रसन्नतेच्या वातावरणाने भरलेल असतो. त्यामुळे बरेच जण घर आणि गाडी खरेदीला प्राधान्य देतात. अशात तुम्ही जर घर खरेदीचा विचार करत असल्यास आम्ही तुमच्यासाठी सर्वात स्वस्त व्याजदर असलेल्या बॅंकाची माहिती देणार आहोत. या बॅंकाचे व्याजदर पैसाबाझारने त्यांच्या वेबसाईटवर दिले आहेत.
Table of contents [Show]
स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI)
तुम्ही जर SBI मधून लोन घ्यायचा विचार करत असल्यास, तुम्हाला 30 लाखापर्यंतच्या लोनसाठी 8.40 टक्के ते 10.15 टक्के व्याज भरावे लागणार आहे. तेच जर तुम्हाला 30 लाख ते 75 लाखापर्यंतच्या रकमेचे लोन हवे असल्यास बॅंक 8.40 टक्के ते 10.05 टक्के व्याज आकारत आहे. तसेच, 75 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या लोनसाठी तुम्हाला 8.40 टक्के ते 10.05 टक्के व्याज भरावे लागणार आहे.
युनियन बॅंक ऑफ इंडिया (Union Bank of India)
तुम्हाला युनियन बॅंक ऑफ इंडियामधून लोन काढायचे असेल तर तुम्हाला 30 लाखापर्यंतच्या लोनसाठी 8.40 टक्के ते 10.80 टक्के व्याज भरावे लागणार आहे. तेच जर तुम्ही 30 लाख ते 75 लाखापर्यंतच्या रकमेचे लोन घेणार असल्यास बॅंक 8.40 टक्के ते 10.95 टक्के व्याज आकारत आहे. याशिवाय, 75 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या लोनसाठी तुम्हाला 8.40 टक्के ते 10.95 टक्के व्याज द्यावे लागणार आहे.
यूको बॅंक (UCO Bank)
तुम्हाला जर यूको बॅंकेतून लोन घ्यायचे असल्यास बॅंक 30 लाखापर्यंतच्या लोनसाठी 8.45 टक्के ते 10.30 टक्के व्याज आकारत आहे. तेच जर तुम्ही 30 लाख ते 75 लाखापर्यंतच्या रकमेचे लोन घेणार असल्यास बॅंक 8.45 टक्के ते 10.30 टक्के व्याज आकारत आहे. तसेच, 75 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या लोनसाठी तुम्हाला 8.45 टक्के ते 10.30 टक्के व्याज द्यावे लागणार आहे.
बॅंक ऑफ इंडिया (Bank of India)
तुम्ही जर बॅंक ऑफ इंडियातून लोन घेत असल्यास 30 लाखापर्यंतच्या लोनसाठी 8.50 टक्के ते 10.75 टक्के व्याजदर आहे. तसेच, तुम्ही 30 लाख ते 75 लाखापर्यंतच्या रकमेचे लोन घेणार असल्यास बॅंक 8.50 टक्के ते 10.75 टक्के व्याज आकारत आहे. याशिवाय, 75 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या लोनसाठी तुम्हाला 8.45 टक्के ते 10.75 टक्के व्याज भरावे लागणार आहे.
बॅंकेचे व्याजदर स्वस्त असले तरी बॅंकांच्या नियमानुसार लोन घेण्यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या प्रक्रिया कराव्या लागतात. तसेच, महत्वाची गोष्ट म्हणजे लोन घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअरही चांगला असावा लागतो. या गोष्टी ध्यानात ठेवून, तुम्ही बॅंकेत लोनसाठी अर्ज करु शकता. तुमचे सर्व पेपर्स क्लिअर असल्यास, तुम्हाला काही दिवसांतच लोन मिळू शकते. तसेच, वरील बॅंकाचे व्याजदर 12 सप्टेंबरपर्यत अपडेटेड आहेत.