जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी गृहकर्ज घेण्याची तयारी करत असाल तर ही बातमी वाचाच. आपण स्वतःच्या मालकीचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत. घर खरेदी करताना बारीक सारीक, प्रत्येक आर्थिक गोष्टीचं नियोजन करावं लागतं. घर खरेदी हा एक मोठा आर्थिक निर्णय असतो. कारण घर खरेदी केल्यानंतर बराच काळ आपल्याला आर्थिक व्यवहार जपून करावे लागत असतात. बहुतेक लोक तर दीर्घकालीन, म्हणजेच 20 ते 30 वर्षे कालावधीसाठी गृहकर्ज घेत असतात.
रिझर्व बँक ऑफ इंडिया वेळोवेळी रेपो रेट ठरवत असे. देशातील महागाईचा परिणाम हा कर्जाच्या व्याजदरांवर पाहायला मिळतो. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआय रेपो रेटमध्ये वाढ करत असते. सध्याच्या पातधोरण बैठीकीत आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळे 6.50% रेपो रेटनुसार बँका कर्जदारांना कर्ज देते आहे. रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदरात सार्वजनिक बँका सेन्ट्रल बँकेकडून कर्ज घेतात. आरबीआयने रेपो रेट वाढवला की बँका घेत असलेले कर्ज महागते. त्यामुळे सामान्य नागरिकांना देखील बँकाकडून कर्ज हे वाढत्या व्याजदरात मिळते.
प्रत्येक बँकेचे व्याजदर हे वेगवेगळे असतात. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही होम लोन घेण्याचा विचार कराल तेव्हा सर्व बँकाचे व्याजदर आधी तपासून बघा. तुमच्या सिबिल स्कोअरनुसार तुमच्या कर्जाचे व्याजदर ठरत असतात. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी तुमचा सिबिल स्कोअर आणि आर्थिक शिस्तीची पुरेपूर काळजी घ्या.
आम्ही तुम्हाला 5 स्वस्त गृहकर्ज देणाऱ्या बँकांची माहिती याठिकाणी देत आहोत. चला जाणून घेऊया कोणत्या बँका सर्वात स्वस्त गृहकर्ज देत आहेत.
एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, इंडियन बँक,पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या पाच बँक सध्या ग्राहकांना तुलनेने कमी व्याजदरात गृहकर्ज देत आहेत. पैकी HDFC बँकेचे गृहकर्ज कमी व्याजदरात दिले जात आहे. तुम्ही देखील स्वस्त दरातील गृहकर्जांच्या शोधात असाल तर या पाच बँकांशी तुम्ही संपर्क साधू शकता. आधीच कल्पना दिली असल्याने, तुमच्या सिबिल स्कोअरनुसारच तुमच्या होम लोनचे व्याजदर ठरणार आहेत.
आयकर कायद्यानुसार, गृहकर्जावर भरलेले व्याज 2 लाखांच्या मर्यादेपर्यंत आयकर सवलत मिळण्यास पात्र आहेत. आयकराच्या कलम 80C अंतर्गत कर्जदार ग्राहकांना 1.5 लाख रुपयांची आयकरात वजावट उपलब्ध आहे.