तुम्ही जर स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्ही वाचलीच पाहिजे. येत्या जून-2023 मध्ये काही ब्रांडेड मोबाईल कंपन्या त्यांचे नवे मोबाईल लॉन्च करणार आहेत. चला तर जाणून घेऊयात बेस्ट फीचर्स असलेले हँडसेट.
ओप्पो रिनो 10 (Oppo Reno 10), वन प्लस नॉर्ड (OnePlus Nord), इनफिक्स नोट 30 सिरीज (Infinix Note 30 Series), आयक्यूओओ निओ प्रो (iQOO Neo 7 Pro), रिअलमी 11 प्रो (Realme 11 Pro), रिअलमी 11 प्रो+ (Realme 11 Pro +),आणि Galaxy F54 सिरीज असे काही खास स्मार्टफोन येत्या काही दिवसांत रिलीज होणार आहेत.
Table of contents [Show]
Samsung Galaxy F54 सेरीज
स्मार्टफोन निर्माता दिग्गज कंपनी सॅमसंग येत्या जून महिन्यात भारतात एक नवीन हँडसेट Galaxy F54 5G लॉन्च करायची शक्यता आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा फुलएचडी प्लस डिस्प्ले दिला जाणार आहे.कॅमेराबद्दल जर बोलायचं झाल तर 108-मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, 32-मेगापिक्सेल, 8-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा सेन्सर फ्रंट कॅमेरा देखील यात असणार आहे. Google Play Console सर्टिफिकेशन या मोबाईलवर मिळणार आहे हे याचे वैशिष्ट्य. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy F54 सेरीज हा फोन 26,000 ते 27,000 रुपयांपर्यंत भारतात खरेदी करता येणार आहे.
Realme 11 Pro 5G सेरीज
रिअलमी कंपनी येत्या जून महिन्यात भारतात Realme 11 Pro 5G सीरीज लाँच करणार आहे.हा मोबाईल फोन चीनमध्ये याआधीच लॉन्च करण्यात आला आहे. Realme 11 Pro आणि Realme 11 Pro Plus असे दोन हँडसेट एकाच वेळी लॉन्च होण्याची शक्यता आहे. या दोन्ही हँडसेटमध्ये 6.7-इंच फुल HD Plus डिस्प्ले आणि ऑक्टाकोर 6nm MediaTek Dimensity 7050 SoC प्रोसेसर दिला जाणार आहे. फोनच्या पॉवरबाबत बोलायचं झालं तर 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. 67W फास्ट चार्जर बेस व्हेरिएंटसह आणि 100W फास्ट चार्जर प्रो व्हेरिएंटसह दिला जाणार आहे.
Realme 11 Pro series 5G coming to India in June.#Realme #Realme11ProPlus #realme11ProSeries5G pic.twitter.com/eigkenJUXm
— Mukul Sharma (@stufflistings) May 25, 2023
Infinix Note 30 सेरीज
Infinix Note 30 सीरीज येत्या महिन्यात भारतात लॉन्च होऊ शकते. इनफिक्स नोट 30 सिरीजचे मोबाईल इतर देशांमध्ये आधीच लॉन्च करण्यात आले असून Infinix Note 30, Infinix Note 30i, Infinix Note 30 5G आणि Infinix Note 30 Pro या मोबाईलला मोठी मागणी आहे. भारतातील मोबाईल फोनची बाजारपेठ लक्षात घेता कंपनीने भारतात हा मोबाईल लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोबाईलमध्ये यूजर्सना 6.78 इंच FHD प्लस डिस्प्ले अनुभवता येणार आहे, जो 120Hz च्या रिफ्रेश रेटसह उपलब्ध असेल. तर Infinix Note 30 Pro मध्ये कंपनी 108 मेगापिक्सेल कॅमेरा, 5000 mAh ची दीर्घकाळ चालणारी बॅटरी देत आहे.
OnePlus Nord 3
वन प्लस नॉर्ड हा चीनी बनावटीचा स्मार्टफोन असून भारतात त्याला मोठी मागणी आहे.कंपनी लवकरच नॉर्ड सीरिजचा नवीन स्मार्टफोन Oneplus Nord 3 देखील लॉन्च करणार आहे. ज्यामध्ये यूजर्सना 6.74-इंच डिस्प्ले उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. यासोबतच हा स्मार्टफोन Mediatek Dimensity 9000 प्रोसेसरसह अनुभवता येणार आहे. फोटोग्राफीबद्दल बोलायचं झाल्यास वन प्लस नॉर्ड 30 फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा Sony IMX890 OIS प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेल UW आणि 2 मेगापिक्सेल तिसरा कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच, सेल्फी प्रेमींना 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. कंपनी या फोनची किंमत जवळपास 32,000 रुपये असेल असा अंदाज आहे.