तुम्हाला नवीन मोबाईल खरेदी करायचा असेल आणि त्यासाठी तुम्ही बजेट फ्रेंडली स्मार्टफोन शोधत असाल तर ही बातमी आहे खास तुमच्यासाठी. एकापेक्षा एक फीचर्स उपलब्ध करून देणारे ब्रँड सध्या भारतीय बाजारांमध्ये आहेत. वाढत्या स्पर्धेमुळे साहजिकच मोबाईल फोनचे दर देखील कमी झाले आहेत. अशाच काही ब्रँडेड मोबाईल फोन बद्दल आपण बोलणार आहोत जे केवळ 10 हजारांच्या आत सध्या उपलब्ध आहेत.
Table of contents [Show]
लावा ब्लेझ 2 (Lava Blaze 2)
तुम्हांला माहितीच असेल की लावा ही मोबाईल उत्पादक भारतीय कंपनी आहे. लावा कंपनीचे ब्लेझ 2 हे स्मार्टफोन खास फीचर्ससह 8 ते 9 हजारांच्या दरम्यान तुम्हांला खरेदी करता येणार आहेत. या मोबाईल फोनमध्ये 6 जीबी रॅम (RAM) आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध आहे. 6.5 इंच एचडी प्लस रिजोलुशन स्क्रीन या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचं झालं तर 5000 mAh क्षमतेची बॅटरी या मोबाईल साठी देण्यात आली असून 18 वॅट फास्ट चार्जिंगचे विशेष फिचर देखील देण्यात आले आहे. मोबाईलचा मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा असून रेअर कॅमेरा 8 मेगा पिक्सेलचा आहे. सामान्य ग्राहकांना परवडणारा आणि बेस्ट फीचर्स देणारा हा मोबाईल हँडसेट आहे.
मोटोरोला E13 (Motorola E13)
मोटोरोलाचा हा खास मोबाईल 2 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. ऑक्टा कोअर 1.6 GHz प्रोसेसर असलेला हा मोबाईल 8 ते 9 हजारांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. यात 6.5 इंच डिस्प्ले दिला असून 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये 13 MP रेयर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलक्सी M04 (Samsung Galaxy M04)
सॅमसंग कंपनीचे जर तुम्ही चाहते असाल तर ही डील तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह हा मोबाईल उपलब्ध आहे. 8 जीबी रॅमचा व्हॅरीएंट देखील यात उपलब्ध आहे. 6.5 इंच डिस्प्ले आणि 5000 mAh ची बॅटरी यात उपलब्ध आहे. तसेच यात ड्यूअल कॅमेरा सेटअप असून यात 1080 पिक्सलवर व्हिडीओ शूटिंगचा अनुभव देखील घेता येणार आहे. 8,500 हजारांपासून या मोबाईल फोनची खरेदी ग्राहकांना करता येणार आहे.
What an amazing launch event that was!
— Redmi India (@RedmiIndia) May 19, 2023
Here's a recap of the #RedmiA2 series.
▶️ Octa-core Helio G36 Processor
▶️ Big 16.56cm(6.52) HD+ Display
▶️ Premium Leather Texture Design
Available at a starting price of ₹5,999* on 23rd May.
Know More: https://t.co/40QZY9ZmvV pic.twitter.com/eZmnpOgSlq
रेडमी A2 (Redmi A2)
रेडमी मोबाईल फोनचे अनेक चाहते आहेत. तुमचे बजेट मोबाईल फोन खरेदीसाठी जर 6 ते 7 हजारांच्या दरम्यान असेल तर हा मोबाईल फोन तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज तुम्हाला यात उपलब्ध होऊ शकेल. तसेच 4 जीबी रॅमचा पर्याय देखील यात उपलब्ध आहे. पॉवरफुल ऑक्टा कोअर G36 चा प्रोसेसर यात दिला असून 5000mAh बॅटरी आणि 10W चार्जरचा यांत समावेश आहे.मोबाईल कॅमेराबाबत बोलायचं झालं तर रेयर कॅमेरा 8 MP आणि फ्रंट कॅमेरा 5 MP मध्ये देण्यात आला आहे.
नोकिया C32 (Nokia C32)
नोकिया फोनचे जर तुम्ही चाहते असाल आणि नोकियामध्ये बजेट फ्रेंडली मोबाईल शोधत असाल तर 9 हजारांच्या आसपास Nokia C32 हा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करू शकता. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज यात देण्यात आला आहे. पाणी आणि धुळीपासून संरक्षण करण्याजोगे फीचर्स यात देण्यात आले आहेत. ही या स्मार्टफोनची खास विशेषता आहे. बॅटरी पॉवरचं विचाराल तर 5050 mAz ची बॅटरी यात देण्यात आली असून एकदा की बॅटरी फुल चार्ज झाली की 3 दिवस ती पुरेल असा कंपनीकडून दावा केला गेलाय. LED फ्लॅशसह 13+2+2 MP रेयर कॅमेरा आणि 5 MP फ्रंट कॅमेरा यात देण्यात आला आहे.