Health Insurance: आरोग्य विमा घेताना शारीरिक तसेच मानसिक संरक्षण घेणे आवश्यक आहे. विमा कंपन्या मानसिक आरोग्याबाबत इतक्या जागरुक नसतात.अलिकडे, विमा नियामक IRDA ने खाजगी विमा कंपन्यांना मानसिक विमा संरक्षण देण्याचे करण्याचे निर्देश केले आहे. मानसिक आरोग्य विमा पॉलिसी (Health Insurance Policy) तुम्हाला वैद्यकीय खर्चासाठी (Medical Expenses)मदत करते. सर्वसमावेशक विमा पॉलिसी मानसिक आणि शारीरिक आरोग्य कव्हर करते.
जेव्हा आपण आरोग्याबद्दल बोलतो तेव्हा सहसा केवळ शारीरिक आरोग्य लक्षात ठेवले जाते. विमा पॉलिसी घेताना हीच परिस्थिती असते. तिथेही तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देत नाही. कोविड-19 (Covid-19) मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शरीर तसेच मन सुदृढ ठेवण्याबाबत लोकांना जागरुकता आली. विमा पॉलिसीमध्ये मानसिक आरोग्य अॅड करण्यासाठी 5 वर्षांपूर्वी कायदा करण्यात आला होता, परंतु अनेक विमा कंपन्यांनी अजूनही त्याचे पालन सुनिश्चित केलेले नाही. मात्र, आयआरडीएच्या (IRDA)आदेशानंतर यात बदल होण्याची अपेक्षा आहे. विमा घेताना, तुम्हाला त्यात मानसिक आरोग्य कवच मिळत आहे की नाही याकडेही लक्ष दिले पाहिजे. विमा खरेदी करताना मानसिक आरोग्य कवच का घ्यावे याबाबत जाणून घेण्याकरिता वाचा हा लेख.
वैद्यकीय खर्च (Medical expenses)
मानसिक आजारांसाठी वैद्यकीय खर्च खूप जास्त लागतो. वैद्यकीय सुविधा दिवसेंदिवस महाग होत आहेत. सर्वसमावेशक आरोग्य विमा पॉलिसी वाढत्या महागाईत मानसिक आरोग्य रुग्णांसाठी वरदान ठरू शकते. विमा पॉलिसीचे कवच घेतल्यानंतर, उपचारांच्या खर्चात वाढ झाल्यामुळे तुमच्या खिशावर कोणताही परिणाम होणार नाही. ही विमा पॉलिसी तुम्हाला अडचणीच्या वेळी आर्थिक मदत (financial aid) करेल. याबाबत अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
आरोग्य तपासणी सुविधा
आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत, विमाधारकाला आरोग्य तपासणीची सुविधा मिळते, याच्या मदतीने तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यातच कोणत्याही आजाराचे निदान लावू शकता. विमा तुम्हाला पाहिजे त्या टेस्ट करून घेण्याची सुविधा देतो ज्यामुळे लवकरात लवकर रोगापासून मुक्त होण्यास मदत होते. नंतर तुमच्या आजाराचे निदान लागल्यास तुमच्या आर्थिक भारावर लक्षणीय वाढ होऊ शकते. सर्वसमावेशक आरोग्य विमा पॉलिसीमध्ये तुमच्या शारीरिक आरोग्याचीही काळजी घेतली जाईल. यामध्ये, विमाधारकाला आजार होण्यापूर्वीच त्याच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी अनेक सुविधा दिल्या जातात. यामध्ये लाइफस्टाईल , डिसीज मॉनिटरिंग आणि फिटनेस ट्रॅकिंग (Fitness tracking) इत्यादींचा समावेश आहे.