Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गृहकर्जासाठी तपासा आर्थिक क्षमता

गृहकर्जासाठी तपासा आर्थिक क्षमता

गृहकर्जासाठी मागणी अर्ज करण्यापूर्वीही काही महत्त्वपूर्ण गोष्टींवर चर्चा करणे अपेक्षित आहे.

गृहकर्ज घेण्यापूर्वी आपण गृहकर्ज घेण्यास कितपत पात्र आहोत, याची पडताळणी करणे अत्यावश्यक असते. गृहकर्ज घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वप्रथम गृहकर्ज देणार्‍या कंपनीच्या निकषांमध्ये आपण बसतो की नाही, हे तपासून पाहायला हवे.

  • वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेबसाइटवर जाऊन त्यांचे कर्जाच्या योग्यतेसंबंधीचे निकष समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर गृहकर्ज घेण्यासाठी आवश्यक दस्तावेज आपल्याकडे आहेत याची खातरजमा करायला हवी. उदाहरणार्थ पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, प्राप्तिकर विवरणपत्र इ. काही राज्यांमध्ये यासाठी रहिवासाचा दाखला सक्तीचा करण्यात आला आहे. 
  • आपले उत्पन्न जर कर्जाच्या रकमेसाठी पुरेसे नसेल तर कर्ज देणारी कंपनी आपल्याला एक सहकर्जदार आणण्यास सांगते किंवा ‘जॉइंट लोन’ घेण्याची सूचनाही करू शकते. अशा प्रकरणांत सहकर्जदाराची कागदपत्रेही योग्य असायला हवीत.
  • आपल्याला कर्ज देणारी कंपनी आपल्याला कर्ज देण्यापूर्वी आपला ‘क्रेडिट स्कोअर’ पाहते. क्रेडिट स्कोअर हा एक तीनअंकी क्रमांक असून, एखाद्या व्यक्तीची कर्जासाठीची पात्रता त्यावरून समजते. सामान्यतः 750 किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर (सिबिल स्कोअर) असणार्‍यांना कर्जासाठी चांगल्या ऑफर मिळतात. स्कोअर कमी असला तरी कर्ज मिळू शकते; परंतु अशा व्यक्तींना अधिक दराने व्याज मोजावे लागते. आपल्याला गृहकर्ज घ्यायचे असल्यास आपल्या आर्थिक तयारीचे मूल्यांकन करावे लागते. आपली अ‍ॅफोर्डेबिलिटी आपल्या परतफेडीच्या क्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे आपले उत्पन्न आणि सध्याचे कर्ज एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
  • आपल्यावर कोणतेही क्रेडिट कार्ड बिल बाकी नसेल किंवा कार लोन, पर्सनल लोन, ग्राहक कर्ज(Consumer loan) किंवा शैक्षणिक कर्ज असेल तर आपली कर्ज परतफेडीची क्षमता अन्य EMI रकमेइतकी कमी मानली जाईल. आपले सर्व ईएमआय मिळून होणारी रक्कम आपल्या उत्पन्नाच्या (टेक होम उत्पन्न) चाळीस टक्क्यांहून अधिक असता कामा नये. असे असेल तर आपल्या आर्थिक क्षमतेवर अधिक परिणाम होणार नाही. जर आपण अन्य कर्जे घेतली असतील तर गृहकर्जाची रक्कम कमी ठेवावी. असे केल्यास आपल्या आर्थिक क्षमतेवर अधिक दुष्परिणाम होणार नाही. आपल्याला आपले नेहमीचे खर्चही भागवायचे आहेत आणि शिवाय भविष्यासाठी बचत, गुंतवणूक करायची आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. हे सर्व खर्च आपल्या नियमित ईएमआयच्या जोडीने सुरू राहिले पाहिजेत.
  • आपण गृहकर्ज एखाद्या बँकेकडून घेतले किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून (एनबीएफसी) घेतले तरी आपापल्या नियमावलीनुसार प्रत्येक संस्था डाउन पेमेन्टच्या रूपात, घराच्या एकूण किमतीच्या पाच टक्के ते तीस टक्के एवढी रक्कम भरायला सांगतात. डाउन पेमेन्ट जितके अधिक असेल तितकीच कर्ज परतफेडीची चिंता कमी असेल. त्यामुळे व्याजातही बचत होते आणि कर्ज परतफेडीची मुदतही कमी होते.
  • जर आपल्याला खरेदी करावयाच्या घराच्या किमतीच्या 20 ते 30 टक्के रक्कम उपलब्ध असेल किंवा आपण एखादी मुदत ठेव वा अन्य गुंतवणूक करून ठेवली असेल, तर आपण सुरक्षित रीतीने गृहकर्ज घेऊ शकतो.
  • घर खरेदी करताना काही अन्य शुल्कही भरावे लागते. उदाहरणार्थ, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, देखभाल खर्च, सुरक्षा खर्च इत्यादी. त्यामुळे आपल्या खिशावर अतिरिक्त बोजा पडू शकतो. त्यामुळे गृहकर्जाच्या आधाराने घरखरेदी करताना आपल्या आर्थिक क्षमतेची पडताळणी करताना असे खर्चही गृहित धरले पाहिजेत.
  • जर गृहकर्ज घेण्याविषयी तुम्ही गंभीर असाल, तर एक विमा पॉलिसी खरेदी करण्याबाबतही तुम्हाला तितकेच गंभीर राहणे आवश्यक आहे. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास एक टर्म किंवा होम इन्शुरन्स पॉलिसी त्याच्या कुटुंबीयांना संपूर्ण कर्जाची परतफेड करण्यास मदत करते. आपण सर्वजण आपापल्या जीवनात चांगलेच घडेल अशी अपेक्षा करतो; परंतु अघटितासाठीही आपण तयार असायला हवे.