Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sony Playstaiton For Disabled: दिव्यांग व्यक्तींना गेम खेळणं सोपं, सोनीकडून PS5 मध्ये बदल

Sony Playstation For Disabled

Image Source : www.indiatoday.in

नुकतेच सोनी कंपनीने कस्टमाइझेबल गेमिंग कंट्रोलर किट बाजारात आणले आहे. या कीटद्वारे दिव्यांग व्यक्तींना गेम (Sony Playstaiton For Disabled) खेळणे सोपे जाणार आहे. त्यासाठी खास फिचर्स या किटला देण्यात आली आहेत.

कॉम्प्युटरवर किंवा ऑनलाईन गेम खेळण्यासाठी सोनी कंपनीचे प्लेस्टेशन सिरीजचे गेमिंग कंसोल प्रसिद्ध असून त्याला बाजारात मोठी मागणी आहे. नुकतेच सोनी कंपनीने कस्टमाइझेबल कंट्रोलर कीट बाजारात आणले आहे. या कीटद्वारे दिव्यांग व्यक्तींना गेम (Sony Playstaiton For Disabled) खेळणे सोपे जाणार आहे. त्यासाठी खास फिचर्स या कंसोलला देण्यात आली आहेत. गेम खेळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कंपनीने 'प्रोजेक्ट लिओनार्डो' सुरू केला होता. त्याअंतर्गत कंपनीने कंट्रोलरमध्ये बदल केले आहेत.

सोनी कंपनीने PS5 या गेमिंग कंट्रोलरमध्ये बदल केले आहेत. या नव्या कंट्रोलरद्वारे दिव्यांग व्यक्तीलाही सहजपणे कंट्रोलर हाताळता येणार आहे. एखादे उपकरण कसे वापरावे या क्षेत्रातील तज्ज्ञ (अॅक्सेसिबिलिटी एक्सपर्ट) कम्युनिटी आणि गेम डेव्हलपरच्या मदतीने कंपनीने कंसोलमध्ये बदल केले आहेत. दिव्यांग व्यक्तीला हाताळण्यास सुलभ होईल अशा रितीने कंट्रोलरची रचना करण्यात आली आहे.

ज्या दिव्यांग व्यक्तींचे हालचालीवर नियंत्रण नसते (लिमिटेड मोटार स्किल्स) जसे की, एखादी वस्तू हातात नीट धरता येत नाही, लहान बटने दाबताना येणारी अडचण, खूप वेळ एखादी वस्तू हातात घटट् पकडून ठेवण्यातील अडथळे, हाताच्या बोटांवर नियंत्रण नसणे, अशी आव्हाने असणाऱ्या व्यक्तींना सुलभ पद्धतीने गेमिंगचा आनंद घेता यावा यासाठी कंपनीने कंसोल बदलला आहे.

नव्या बदलानुसार गेमिंग कंट्रोलर ३६० डिग्रीमध्ये फिरू शकतो. तसेच त्याला वायरलेस पद्धतीनेही इतर डिव्हाइससोबत कनेक्ट करता येईल. कंसोलवरील कोणतेही बटन दाबताना सोपे होईल अशा पद्धतीने बटनांची रचना आणि डिझाइन तयार करण्यात आले आहे. गेमिंग कंट्रोलर वापरकर्त्याला पाहिजे त्या पद्धतीने कस्टमाइज करता येणार आहे. मागील वर्षी सोनीच्या गेमिंग प्लेस्टेशन फाइव्हचा बाजारात तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, आता बाजारातील प्लेस्टेशनचा पुरवठा सुरळीत झाल्याचे कंपनीच्या गेमिंग विभागाचे प्रमुख जीम रायन यांनी सांगितले.