Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Basmati Rice Export Ban: केंद्र सरकारने बासमती तांदळाची निर्यात रोखली, काय आहे यामागचे कारण? जाणून घ्या

Basmati Rice

केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार बासमती तांदळाच्या निर्यातीला 1200 डॉलर प्रति टन दरापेक्षा कमी किमतीत निर्यातीची परवानगी दिली जाणार नाहीये. तसेच आंतराष्ट्रीय बाजारात इतका भाव मिळणे कठीण असल्याचे मानले जात आहे. भाव मिळाला तरी बासमती तांदळाची मागणी मंदावेल असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे.

तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने आता बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यांनतर आता थेट बासमती तांदळाचा निर्यातीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. (Basmati Rice) 

काही नियम व अटींच्या अधीन राहून व्यापारी निर्यात करू शकतात मात्र सरसकट तांदूळ निर्यातीचे मार्ग आता बंद करण्यात आले आहे. अधिकृत माहितीनुसार, तांदूळ निर्यातीच्या बंदीची घोषणा करताना सरकारने 1200 डॉलर प्रति टन पेक्षा जास्त दराने निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. (Basmati Rice Export from India)

याचाच अर्थ बासमती तांदळाच्या निर्यातीला 1200 डॉलर प्रति टन दरापेक्षा कमी किमतीत निर्यातीची परवानगी दिली जाणार नाहीये. तसेच आंतराष्ट्रीय बाजारात इतका भाव मिळणे कठीण असल्याचे मानले जात आहे. भाव मिळाला तरी बासमती तांदळाची मागणी मंदावेल असा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे.

निर्यात बंदीचे कारण काय? 

देशभरात किरकोळ महागाईच्या दरात भाववाढ होताना दिसते आहे. यावर्षी मान्सूनचा समाधानकारक पडताना दिसत नाहीये. झारखंड , उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये तांदळाच्या पिकाची लावणी अजूनही लांबली आहे. यावर्षी तांदूळ उत्पादनात 5 टक्क्यांनी घट होऊ शकते असा इशारा वाणिज्य मंत्रालयाने याआधीच दिला आहे.

येणाऱ्या काळात तांदळाचे भाव वाढू शकतात, तसेच मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडू शकते हे लक्षात घेऊन अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण म्हणजेच The Agricultural and Processed Food Products Export Development Authority (APEDA) ने तात्काळ प्रभावाने 1200 डॉलर प्रति टन दरापेक्षा कमी किमतीत तांदूळ निर्यातीला परवानगी दिली जाणार नाहीये असे स्पष्ट केले आहे.

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात भारताने 4.8 अब्ज डॉलर किमतीचा 4.56 दशलक्ष टन बासमती तांदूळ निर्यात केला होता. गेल्या आर्थिक वर्षात तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीमुळे लाभ मिळाला होता. यावर्षी मात्र देशांतर्गत मागणीला सरकार प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

गैरव्यवहाराला बसेल चाप 

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. बंदी असतानाही बासमती तांदळाच्या नावाखाली बिगर बासमती तांदळाची निर्यात सुरु होती. आता सर्व प्रकारच्या तांदळावर निर्यात बंदी आणल्यानंतर अशाप्रकारचे गैरव्यवहार थांबतील आणि देशांतर्गत पुरवठा योग्यरीत्या होईल असा विश्वास व्यापार व उद्योग मंत्रालयाने दर्शवला आहे.