Car Caught Fire, How to Claim Insurance: सध्या चार चाकी खरेदी करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. ग्राहक नवीन गाडीची निवड करताना त्याची सखोल चौकशी करूनच गाडी खरेदी करतो. पण ही महागडी गाडी खरेदी केल्यानंतर म्हणजेच यावर अधिक पैसा खर्च केल्यानंतर...जर गाडीला काय झाले तर काय करायचे? याचे पूर्वनियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी जर तुम्हाला गाडी नुकसान भरपाई म्हणून योग्य प्रकारे इन्शुरन्सची (Insurance) रक्कम प्राप्त करायची असेल, तर तुम्ही विम्या रक्कमसाठी अचूक दावा करणे आवश्यक आहे. जाणून घ्या, हा दावा कसा करायचा?
Table of contents [Show]
असा करा दावा (Claim for Insurance)
गाडीला आग लागली असेल, तर त्यासंबंधी सर्वप्रथम एफआयआर (FIR) नोंदवा. ज्या कंपनीचा विमा काढला असेल, त्यांना ही कळवा. कारण विमा कंपनीचा कर्मचारी तुमची गाडी चेक करेल. त्यावेळी त्याला सर्व माहिती अचूक सांगा. तो एफआयआरची प्रत मागेल, तर त्याला द्या. चुकीची माहिती बिलकूल सांगू नका, नाही तर तुमचेच नुकसान होईल.
कसा मिळेल हक्क (How to Get the Right)
मोटार पॅकेज पॉलिसी अंतर्गत आगीमुळे गाडीचे नुकसान किंवा त्यांच्या भागांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळेल या नियमांचा समावेश आहे. यासाठी तुम्हाला कंपनीकडे दावा करायला लागतो.
विमा असण्याचे फायदे (Benefits of having Insurance)
विमा असलेली कार चोरीला गेली किंवा अचानक त्या गाडीचा अपघात झाला, तर गाडीची भरपाई म्हणून विमा कंपनीकडे दावा केल्यास विमा स्वरूपात काही रक्कम मिळते.
विमासाठी आवश्यक कागदपत्रे (Documents Required for Insurance)
सर्वप्रथम ज्या कंपनीकडून तुम्ही विमा पॉलिसी घेतली होती, त्या एजंटला कळवावे लागेल. त्यानंतर तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत एफआयआर दाखल करावा लागेल. आग लागलेल्या गाडीचा फोटो काढावीत, जेणेकरून पुरावा म्हणून दाखविण्यास उपयोगी होईल. एफआयआर नोंदवल्यानंतर, तुम्हाला विमा दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रे जसे की, ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, एफआयआर, गाडीला लागलेल्या आगीचा फोटो आणि इतर कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे.