Mahila Samman Savings Certificate-MSSC: महिला आणि मुलींना सामान्य बचत योजनांच्या तुलनेत अधिक व्याज देण्यासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजना सरकारने सुरू केली आहे. या योजनेत महिलांना गुंतवणुकीवर 7.5% दराने व्याज मिळते. एमएसएससी'मध्ये दोन वर्षांसाठी पैसे जमा करावे लागतात. दोन वर्षानंतर, तुम्हाला व्याज आणि मुद्दलसह संपूर्ण रक्कम परत मिळते. महिला या योजनेत दोन लाख रुपये पर्यंतचे रक्कम जमा करू शकतात. मात्र महिलांनी या योजनेत गुंतवणूक केली आणि काही कालावधीनंतर हे पैसे मुदतपूर्वी काढायचे असल्यास किंवा खाते बंद करायचे असल्यास सरकारचा नियम काय आहे?
MSSC खाते मुदतपूर्व बंद करण्याचे नियम
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत केलेली गुंतवणुकीचा कालावधी दोन वर्षांनंतर पूर्ण होतो. पण या दरम्यान तुम्हाला हे खाते बंद करायचे असल्यास एक वर्षानंतर तुम्ही जमा केलेल्या एकूण रकमेच्या 40% पैसे काढू शकता. म्हणजेच जर तुम्ही दोन लाख रुपये जमा केले असतील तर एका वर्षानंतर तुम्ही 80 हजार रुपये काढण्यासाठी पात्र असता. तसेच खातेधारकाचा मृत्यू झाल्यास हे खाते त्वरित बंद केले जाऊ शकते. परंतु अशा स्थितीत व्याजदर 2% कमी करून हे पैसे गुंतवणूकदाराला परत केले जातात.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत 7.5 टक्के व्याज दराने पैसे मिळत आहेत. सरकारने या व्याजदरात बदल केल्यास आधीच उघडलेल्या खात्यावर कुठलाही परिणाम होत नाही. म्हणजेच खाते उघडण्याच्या तारखेपासून जो काही व्याजदर निश्चित केला असेल, तोच मुदतपूर्तीपर्यंत लागू असेल.
www.zeebiz.com