जर एका दांपत्याला 2 किंवा त्याहून अधिक आपत्य असतील आणि त्यांना कुणा एकाच मुलाला किंवा मुलीला सर्व संपत्ती द्यायची असेल तर त्यासाठी कायद्याचे प्रावधान आहे का? आईवडील आपल्या मुलांना संपत्तीतून बेदखल करू शकतात का? असे प्रश्न तुम्हांला कधीतरी पडले असतील. याबद्दलच या लेखात आपण जाणून घेऊयात…
खरे तर भारतात, पालकांना त्यांची मालमत्ता एका अपत्याला देण्याची इच्छा असल्यास त्यांना देण्याचा कायदेशीर अधिकार आहे, हे लक्षात असू द्या. खरे तर नोंदणीकृत गिफ्ट डीड (Registered Gift Deed) किंवा मृत्युपत्राद्वारे (Will or Testament) मालमत्ता भेट दिली जाऊ शकते.
भारतीय कायदा मृत्युपत्र आणि एखाद्याच्या हयातीत वारसाहक्काच्या बाबतीत निर्णय घेण्यास मान्यता देतो. याद्वारे संपत्तीचे वाटेकरी कोण असतील याचा निर्णय घेण्याची संपूर्ण मुभा संपत्तीचे मालक असलेले आई-वडील घेऊ शकतात. अशाप्रकारे संपत्ती कुणा एका अपत्याच्या नावावर करण्यासाठी खाली दिलेले मार्ग अवलंबता येतात.
नोंदणीकृत गिफ्ट डीड (Registered Gift Deed)
पालक त्यांच्या कोणत्याही मुलांना त्यांची मालमत्ता भेट देण्यासाठी नोंदणीकृत गिफ्ट डीड अंमलात आणू शकतात. ज्याच्या नावावर गिफ्ट डीड म्हणजेच बक्षिसपत्र केले असेल ती व्यक्ती संपत्तीचा कायदेशीर मालक म्हणून मानला जातो.
मृत्युपत्राचा पर्याय
पालक त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेचे वितरण कसे करावे हे अधोरेखित करणारे मृत्युपत्र लिहू शकतात. परंतु या मृत्युपत्राला कायदेशीर मान्यता असावी लागते. वकिलांच्या मार्फत आपल्या हयातीत पालक आपले मृत्युपत्र बनवून ठेऊ शकतात.
कारण हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार,मुस्लिम वैयक्तिक कायदा तसेच इतर धर्माच्या कायद्यानुसार रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना संपत्तीतून बेदखल करता येत नाही. मात्र नोंदणीकृत गिफ्ट डीड किंवा मृत्युपत्र लिहून ठेवले असल्यास कायदेशीर वारस म्हणून सर्व मुले संपत्तीवर आपला हक्क सांगू शकतात.
म्हणून, मालमत्तेच्या वाटपाबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, पालकांनी योग्य कायदेशीर तज्ञाशी सल्लामसलत करणे शहाणपणाचे आहे.कारण यामुळे भविष्यातील संभाव्य अडचणी, कोर्टकचेऱ्याच्या फेऱ्या वाचू शकतात.