पॅन कार्ड म्हणजेच पर्मनंट अकाउंट नंबर (PAN), आज आर्थिक व्यवहार करायला सर्व ठिकाणी याची आवश्यकता भासते. तसेच, ओळखीचा पुरावा म्हणनही पॅन कार्ड कामी येत आहे. याशिवाय, बॅंकेत खाते उघडणे, इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, डिमॅट खाते उघडणे अशा सर्वच ठिकाणी पॅन आवश्यक आहे. त्यामुळे पॅन कार्डची मुदत संपल्यावर काय असा प्रश्न सर्वांनाच भेडसावतो.
पण, त्याची काळजी करायची गरज नाही. कारण, एकदा पॅन कार्ड तयार झाल्यावर, ते आयुष्यभरासाठी वैध असते. त्यामुळे त्याला रिन्यू करायची गरज नाही. मात्र, पॅन कार्ड धारकाचा मृत्यू झाल्यास, त्या परिस्थितीत कार्ड रद्द होते. नाहीतर तुम्हाला आयुष्यभर त्याला रिन्यू करायची गरज नसणार आहे.
Table of contents [Show]
स्कॅमर्स पसरवताय संभ्रम
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर पॅनकार्डची मुदत संपण्याबाबत काही संभ्रम पसरवण्यात येत आहे. त्यामुळे या संभ्रमात अडकू नका. कारण, स्कॅमर्स लोकांना फसवण्याच्या उद्देशाने या गोष्टी करत आहेत. त्यामुळे कॉल किंवा मेसेजद्वारे पॅन कार्ड रिन्यू करण्यासाठी कोणी तुम्हाला सांगत असल्यास ते करु नका. यासाठी सावधगिरी बाळगा आणि अशा जाळ्यात अडकू नका.
पॅन कार्ड नंबर तोच राहतो
पॅन कार्डवर 10 अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक असतो, ज्याची सुरुवात मोठ्या अक्षरातील इंग्रजी अक्षरांपासून होते. त्यात कार्ड धारकाची स्वाक्षरी, फोटो आणि पत्त्याचा समावेश असतो. तसेच, तुम्ही कार्डवर गरजेनुसार माहिती अपडेट करु शकता. मात्र, एकदा मिळालेला नंबर तुम्हाला बदलवता येणार नाही.
होऊ शकतो दंड?
इन्कम टॅक्स अॅक्ट 1961 च्या सेक्शन 139A अंतर्गत एखाद्या व्यक्तीला एकच पॅनकार्ड जवळ ठेवण्याची परवानगी आहे. जर तुमच्या नावावर आधीच पॅन कार्ड असेल तर तुम्ही नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करू शकत नाही. असे केल्यास सेक्शन 139A चे उल्लंघन होईल आणि सक्षम अधिकाऱ्याकडून यासाठी 10,000 रुपयांपर्यंत दंड ही घेतला जाऊ शकतो.
कार्ड अवैध ठरू शकते का?
विशेष म्हणजे पॅन कार्डची मुदत कधीच संपत नाही. पण, सरकारी नियमानुसार तुम्ही आधार कार्ड पॅन कार्डला लिंक केले नाही. तर तुमचे कार्ड अवैध ठरु शकते. जर तुम्हाला तुमच्या पॅन कार्डची वैधता तपासायची असल्यास, या स्टेप फाॅलो करा.
- इन्कम टॅक्स विभागाच्या ई-फायलिंग वेबसाईटला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ भेट द्या.
- 'Verify your PAN' हा पर्याय निवडा.
- तुमचा पॅन नंबर, नाव, जन्मतारीख आणि संपर्क क्रमांकासह आवश्यक डिटेल्स टाका.
- एकदा तुम्ही माहिती प्रदान केल्यानंतर, तुम्हाला दुसऱ्या पेजवर नेण्यात येईल, जेथे तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेला ओटीपी टाकणे आवश्यक आहे. तसेच, ओटीपी प्राप्त करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या पॅनशी लिंक असल्याची खात्री करा.
- प्राप्त ओटीपी टाका आणि 'Validate' वर क्लिक करा.
- तुमच्या पॅन कार्डसाठी कोणतेही डुप्लिकेशन किंवा अनेक नोंदी नसल्यास, अंतिम पेज पुष्टी करेल की तुमचा पॅन सक्रिय आहे आणि डिटेल्स तुमच्या पॅनशी जुळत आहेत.
- तुमच्याकडे समान वैयक्तिक माहितीशी संबंधित एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्यास, तुम्हाला एक मेसेज प्राप्त होईल. या क्वेरीसाठी अनेक रेकॉर्ड आहेत, अतिरिक्त माहिती द्या. या प्रकरणात, अधिक स्पष्टीकरणासाठी तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव आणि इतर ओळखीचे डिटेल्स देणे आवश्यक आहे.