गुरूवारी (दि. 23 फेब्रुवारी) सेन्सेक्स 0.23 टक्क्यांनी खाली येऊन 59,606 वर बंद झाला होता आणि निफ्टी 17,523 बंद झाला होता. आज एसडीएक्सने चांगले संकेत दिल्याने मार्केट सकारात्मक पद्धतीने ओपन होईल, अशी आशा आहे. तसेच आज दिवसभरात खालील कंपन्यांच्या शेअर्सवर खरेदीदारांची विशेष नजर राहू शकेल.
Table of contents [Show]
झी इंटरप्रायझेस (ZEEL)
झी इंटरप्रायझेसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी पुनित गोयंका यांनी गुरूवारी (दि. 23 फेब्रुवारी) नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे अपील केले आहे. झी एंटरटेनमेंट इंटरप्रायझेस ही कंपनी दिवाळखोरीत गेली असून त्याच्यावर कारवाई करावी, अशी याचिका इंड्सइन बॅंकेने केली होती. त्याविरोधात गोयंका यांनी अपील केले होते. त्यावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे गुरूवारी झी इंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली होती.
लेमन ट्री हॉटेस्ल (Lemon Tree Hotels)
लेमन ट्री हॉटेल्स कंपनीने अॅल्यूर हॉटेल्स आणि एपीजी स्ट्रॅटेजिक रिअल इस्टेट पूल एनव्हीचे 22,00,000 शेअर्स आताच्या शेअर्सधारकांकडून प्राधान्याने खरेदी करण्यास मान्याता दिली.
एचडीएफसी बॅंक (HDFC Bank)
खाजगी क्षेत्रातील बॅंक एचडीएफसीने डॉलर बॉण्डच्या विक्रीतून सुमारे 750 दशलक्ष डॉलर कमावले आहेत.
मुथ्थुट फायनान्स (Muthoot Finance)
कंपनीचे संचालक मंडळ खाजगीरीत्या नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर वितरित करून निधी उभारण्याचा विचार करत असून त्याला मंजुरी देण्याची शक्यता आहे.
अॅक्सिस बॅंक (Axis Bank)
अॅक्सिस बॅंकेने सिटीबॅंकेचा भारतातील बिझनेस सिटीकॉर्प फायनान्स (इंडिया)कडून खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. याला लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया 1 मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जिंदाल स्टील (Jindal Steel)
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने जिंदाल स्टील आणि जिंदाल स्टील (हिसार) या कंपन्यांच्या विलीनीकरणास मंजुरी दिली आहे.
सनोफी इंडिया (Sanofi India)
सनोफी इंडिया संचालक मंडळाने प्रति इक्विटी शेअर 194 रुपयांचा लाभांश देणार असल्याचे म्हटले आहे. तसेच कंपनीने विशेष लाभांश म्हणून प्रति शेअर 183 रुपये देण्याबाबतही म्हटले आहे. कंपनीला 31 डिसेंबर 2022 मध्ये 44.8 टक्क्यांचा नफा झाला असून त्यातून कंपनीला 130.8 कोटी रुपये मिळाले आहेत.
ट्यूब इन्वेस्टमेंट इंडिया (TII)
ट्यूब इन्वेस्टमेंट ऑफ इंडियाने एक्सटू फ्युल्स आणि एनर्जी यांच्याकडील 10,753 शेअर्स खरेदी केले आहेत.