Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Festival Therapy: फक्त एक रुपयांत खरेदी करा Philips चा साउंडबार आणि पार्टी स्पीकर

Festival Therapy

फिलीपची उत्पादने बनविणाऱ्या TPV टेक्नॉलॉजीने ‘Festival Thearapy’ नावाने एक मोहीमच सुरु केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना केवळ 1 रुपयांत डाऊन पेमेंट करून फिलीपची उत्पादने खरेदी करता येणार आहे. तुम्ही देखील जर फिलिपची उत्पादने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक महत्वाची आणि फायद्याची डील ठरू शकते.

सध्या सणासुदीच्या निमित्ताने फ्लिपकार्ट, अमेझॉन, विजय सेल्स, एमआय आदी कंपन्यांनी ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सवलत देऊ केली आहे. आता या स्पर्धेत फिलीप कंपनी देखील उतरली आहे. कंपनीने त्यांच्या ग्राहकांना एक भन्नाट ऑफर देण्याचा निर्णय घेतलाय.

फिलीपची उत्पादने बनविणाऱ्या  TPV टेक्नॉलॉजीने ‘Festival Thearapy’ नावाने एक मोहीमच सुरु केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना केवळ 1 रुपयांत डाऊन पेमेंट करून फिलीपची उत्पादने खरेदी करता येणार आहे. तुम्ही देखील जर फिलिपची उत्पादने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक महत्वाची आणि फायद्याची डील ठरू शकते.

कधीपर्यंत करता येणार खरेदी?

फिलिप्सचा ‘Festival Therapy’ हा सेल 30 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. म्हणजेच यंदाच्या दिवाळीत ग्राहकांना त्यांच्या मनपसंद वस्तूंची खरेदी करता येणार आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार काही निवडक उत्पादनांवरच 1 रुपयांत डाऊन पेमेंट भरण्याची सुविधा देण्यात येणार आहे.

1 रुपयांत डाऊन पेमेंट केल्यानंतर इतर रक्कम सुलभ हफ्त्याने भरण्याची सुविधा फिलीप ग्राहकांना देणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार फिलिप्सची सर्वात जास्त विकली जाणारी काही  ऑडिओ उपकरणे या सेलमध्ये खरेदी करता येतील.यात साउंडबार, पार्टी स्पीकर आणि टॉवर स्पीकर अशा काही ऑडिओ उत्पादनांचा समावेश या सेलमध्ये केला गेलाय.

‘ही’ आहेत उत्पादने! 

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार साउंडबार, पार्टी स्पीकर आणि टॉवर स्पीकरच्या लिस्टमध्ये ग्राहकांना ब्लूटूथ टॉवर स्पीकर (SPA9080B/94 and SPA9120B/94), साउंडबार स्पीकर (TAPB603/94, HTL8162/94) तसेच ब्लूटूथ पार्टी स्पीकर (TAX5206/94), मोनो ब्लूटूथ पोर्टेबल होम थिएटर (TAX3206/94), वायरलेस सबवूफरसह साउंडबार 2.1 (TAB7305/94), वायरलेस सबवूफरसह साउंडबार 3.1.2 (TAB8947/94) आणि वायरलेस सबवूफरसह डॉल्बी ॲटमॉस साउंडबार (TAB7807/94 and TAB8967/94) ही उत्पादने केवळ 1 रुपयांच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करता येईल. ही ऑफर फक्त ऑफलाइन चॅनेलवर लागू आहे,ऑनलाईन खरेदीवर ही ऑफर ग्राहकांना मिळणार नाहीये.