तुम्ही जर स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. 15 हजारा रुपयापर्यंत अगदी कमी बजेट जरी असलं तरी तुम्ही चागंल्या क्वालिटिचा स्मार्ट टीव्ही घेऊ शकता. टीव्हीचे अनेक ब्रँड्स असल्यामुळे नक्की कोणता टीव्ही निवडावा यामध्येही अनेकांचा गोंधळ उडतो. क्वालिटीशी तडजोड न करता तुम्ही कमी किंमतीमध्ये खालील स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करू शकता.
अॅमेझॉन बेसिक्स AmazonBasics 81 cm (32 inches) HD Ready Smart LED Fire TV
AmazonBasics 81 cm (32 inches) HD Ready स्मार्ट टीव्ही तुम्हाला सुमारे 13 हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो. या टीव्हीवर ऑनलाइन शॉपिंग पोर्टल्सवर कायम ऑफरही सुरू असतात. या टीव्हीमध्ये 1366x768 pixels HD रिझॉल्युशन असून 60 hertz रिफ्रेश रेट आहे. 178-degrees वाइड अँगल व्ह्यू तुम्हाला मिळेल. या टीव्हीमध्ये फायर TV ऑपरेटिंग सिस्टिम आहे. अॅलेक्सा, 20 वॅट स्पिकर, डिज्नी, हॉटस्टारसह 5 हजारांपेक्षा जास्त अॅप्स या टीव्हीमध्ये आहेत.
Mi 80 cm (32 inches) HD Ready Android Smart LED TV 4A PRO
एमआय कंपनीचा हा बजेट टीव्ही असून याची किंमत देखील पंधरा हजारांच्या आतमध्ये आहे. या टीव्हीला अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. 64 बिट क्वाडकोर प्रोसेसर, 1 जीबी रॅम, 8 जी इंटरनल स्टोरेज, 20 वॅट स्पिकर, गुगल असिस्टंट अशी फिचर्स या टीव्हीमध्ये आहेत.
टीसीएल स्मार्ट टीव्ही TCL 80 cm (32 inches) HD Ready Smart LED TV
हा टीव्हीमध्ये अॅंड्राईड ऑपरेटिंग सिस्टिम आहे. यामध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटनल स्टोरेज देण्यात आले आहे. HD Ready 1366x768 रिझॉल्यूशन या टीव्हीला देण्यात आले आहे. यामध्ये गुगल प्ले स्टोअरही आहे. साऊंड 16 वॅट क्षमतेचे देण्यात आले आहेत. या टीव्हीवर ऑफर असल्याने 15 हजारांच्या आतमध्ये तुम्हाला मिळू शकतो.
कोडॅक अँड्रॉइड टीव्ही Kodak 80 cm (32 inches) HD Ready Android LED TV
कोडॅकचा हा अँड्रॉइड टीव्ही तुम्हाला 12 हजार रुपयांच्या आतमध्ये मिळून जाईल. 1366x768 HD Ready डिस्प्ले या टीव्हीला देण्यात आला आहे. गुगल प्ले, व्हाइस सर्च, क्रोमाकास्ट अशी फिचर्स यामध्ये आहेत. या टीव्हीमध्ये Cortex A53 quad-core processor वापरण्यात आला आहे.