Gadar 2 Box Office Collection: गदर-2 ची जादू अजून बॉक्स ऑफिसवरून कमी झालेली नाही. रक्षाबंधनानिमित्त सुट्टीच्या दिवशी या चित्रपटाने जवळपास 8.75 कोटींचा बिझनेस मिळवला आहे. त्यामुळे गदर-2 आता 500 कोटींच्या क्लबमध्ये जाण्याच्या तयारीत आहे.
झी स्टुडिओजने (ZEE Studios) रक्षाबंधनाच्या निमित्ताने गदर-2 या चित्रपटावर 29 ऑगस्टपासून Buy 2, Get 2 Tickets Free ही ऑफर लागू केली होती. त्यामुळे कालच्या एका दिवसभरात चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये 71 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. '2 तिकिटांवर 2 तिकिटे फ्री' ही ऑफर 3 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा प्रमुख भूमिका असलेला हा गदरचा सिक्वेल अनिल शर्मा यांनी डायरेक्ट केला आहे. यापूर्वीचा गदर चित्रपटालाही प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. बुधवारी (दि. 30 ऑगस्ट) रक्षाबंधनाच्या निमित्ताने 8.75 कोटींची कमाई केल्याचे एका वेबसाईटने म्हटले आहे. त्यामुळे अवघ्या 20 दिवसात गदर-2 ने 500 कोटींच्या क्लबकडे जाण्यास सुरूवात केली.
इतर चित्रपटांच्या तुलनेत गदर-2 ला प्रेक्षकांकडून जो प्रतिसाद मिळत आहे. त्यावर झी स्टुडिओजने एक अफलातून ऑफर आणली आहे. ती म्हणजे 2 तिकिटांवर 2 तिकिटे फ्रीची. जे कोणी गदर-2 या सिनेमाची दोन तिकिटे खरेदी करेल.त्याला त्यावर 2 तिकिट मोफत दिली जाणार आहे आणि ही ऑफर 3 सप्टेंबरपर्यंत सुरू असणार आहे.
गदर-2 रिलिज झाला तेव्हा त्याने पहिल्याच दिवशी 40 कोटींची टप्पा गाठला होता. त्यानंतर अवघ्या एका आठवड्यात 284 कोटी रुपये मिळवले. पठाण इतकी कमाई करणारा हा या वर्षातील आतापर्यंतचा पहिला चित्रपट ठरला आहे. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 134 कोटी रुपयांचा गल्ला जमवून गदर-2 आता 500 कोटी रुपयांच्या क्लबकडे वाटचाल करत आहे.