Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023 Impact on Share Market: बजेटचा शेअर मार्केटवर काय परिणाम होऊ शकतो?

Budget 2023 Impact on Share Market

Budget 2023 Impact on Share Market: आगामी 2023-24 चा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण 1 फेब्रुवारी रोजी सादर करणार आहोत. त्याचा परिणाम शेअर मार्केटवर काय होईल याविषयी आपण जाणून घेऊ.

शेअर मार्केटवर नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा, घडामोडींचा किंवा बातम्यांचा परिणाम होत असतो. त्यात बजेटच्या दिवशी तर शेअर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अस्थिरता (Volatility) असते. बजेटचा नक्कीच परिणाम मार्केटमध्ये दिसून येत असतो. या अर्थसंकल्पात सरकारकडून एकत्रीकरणावर भर दिला जाण्याची शक्यता आहे, असे जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅन्लने व्यक्त केला आहे.

मॉर्गन स्टॅन्ले या फर्मचे असे म्हणणे आहे की, सरकार या अर्थसंकल्पात सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यावर भर देईल. पायाभूत सुविधांसह रोजगार निर्मितीवरही सरकार भर देईल आणि याचा नक्कीच परिणाम शेअर मार्केटवर होणार. कारण सरकार वित्तीय तूट कमी करण्याबाबत तसेच मोठमोठ्या योजनांची घोषणा करण्याची शक्यता असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

बजेटच्या दिवशी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता

2024च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या दृष्टीने 2023 चा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाताना सरकारकडून वेगवेगळ्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सरकार पायाभूत सोयीसुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्चाची तरतूद करण्यावर भर देईल. यामुळे बाजारात आणि एकूणच वेगवेगळ्या सेक्टरमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येईल. त्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ शकते. पण त्याचवेळी चढ-उतारही तितक्याच प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

बजेटनंतर मार्केट स्थिती काय असेल?

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्याचा प्रभाव काही वेळाने कमी होतो. कारण गेल्या 30 वर्षांचा इतिहास पाहता अर्थसंकल्प सादर करताना किंवा करण्यापूर्वी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येतात. पण थोड्यावेळाने ते नियंत्रणात येतात. पण 2019 आणि 2022 विचार करता या दोन वर्षातील अस्थिरता 11 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली होती. या दोन वर्षांचा अपवाद वगळता 2023 च्या अर्थसंकल्पाचा परिणाम थोडावेळ मार्केटवर दिसून येईल.

1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता सादर होणार बजेट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण या 1 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 11 वाजता लोकसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करतील. त्याचवेळी राज्यसभेत अर्थ राज्यमंत्री बजेट सादर करतात.