Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business idea: ब्रेडचा व्यवसाय करून देईल लाखोंची कमाई! गुंतवणूक आणि नफ्याचं गणित काय?

Business idea: ब्रेडचा व्यवसाय करून देईल लाखोंची कमाई! गुंतवणूक आणि नफ्याचं गणित काय?

Image Source : newstrack.com

Business idea: ब्रेकफास्टला किंवा चहासोबत ब्रेड न खाणारा शोधूनही सापडणार नाही. ब्रेड हा आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य असा भाग किंवा पदार्थ म्हणता येईल. याच ब्रेडच्या व्यवसायाबद्दल काही महत्त्वाची माहिती सविस्तर पाहू...

एखादा व्यवसाय (Business) करण्याचा विचार करत असाल आणि त्यातही खाद्यपदार्थांच्या व्यवसायास पसंती असेल तर ब्रेडचा कारखाना काढून चांगली कमाई करता येईल. कारण कोणताही व्यवसाय करताना कमी गुंतवणूक आणि अधिक नफा याचाच विचार केला जातो. गुंतवणूक मात्र प्रत्येक व्यवसायात करावीच लागते. कालांतरानं गुंतवलेले पैसे कमाईच्या रुपानं मिळतात. आता या ब्रेडचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी कर्ज काढता येवू शकतं. सरकारच्या मुद्रा योजनेच्या (Mudra yojana) आधारे ही प्रक्रिया सुरू करता येईल.

सुरुवातीची गुंतवणूक किती?

ब्रेडच्या व्यवसायातही इतर व्यवसायाप्रमाणे विविध टप्पे आहेत. अगदीच सुरुवात करायची असेल तर कमी बजेटमध्ये तो करता येईल. सरासरी 5 लाख रुपये यात तुम्ही गुंतवू शकता. याचा कारखाना सुरू करण्यासाठी कमीत कमी 500-600 स्क्वेअर फूट इतकी जागा गरजेची आहे. याठिकाणी ब्रेड तयार करण्याचं सर्व साहित्य असणार आहे.

मशीन आणि त्यावरचा एकूण खर्च

सुरुवातीची गुंतवणूक पैशांची आणि जागेची जी गरजेची आहे. त्यासोबत ब्रेड तयार करण्याचं व्यावसायिक गरजेनुसार लागणार साहित्य तुम्हाला घ्यावं लागणार आहे. ब्रेडसाठी काही मशीन्स तुम्हाला लागणार आहेत. यात कणिक म्हणजेच ब्रेडचं पीठ मळण्याचं मशीन (Dough kneader machine) ज्याची किंमत अंदाजे 50000 ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान असेल, ब्रेडचे स्लाइस करण्याचं मशीन (Bread slicing machine) ज्याची किंमत अंदाजे 35000 ते 50000 रुपयांच्या दरम्यान असेल तसंच ओव्हन ज्याची किंमत सरासरी 50000 ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान असेल असं किमान साहित्य लागणार आहे.

कच्चा माल 

वर दिल्याप्रमाणे सर्व साहित्य आवश्यक आहे. आता ब्रेड बनवण्यासाठीची सामग्री ज्यात मैदा, साखर, मीठ, तेल, ब्रेड इम्प्रूव्हर, ग्लूटेन, कॅल्शियम पावडर अशी सामग्री लागणार आहे. त्यासाठीचा खर्च तुम्ही किती प्रमाणात ब्रेडचं उत्पादन करणार आहात, त्यावर अवलंबून असणार आहे.    

कमाई किती?

आजकाल ब्रेडच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. ब्रेडमध्येदेखील अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यामुळे जे लोक डाएटवर आहेत, त्यांच्यासाठीही ब्राउन ब्रेडसह विविध प्रकार उपलब्ध आहेत. ब्रेडच्या छोट्या पॅकची किंमत 20-30 रुपयांपासून होते. तुम्ही नवा व्यवसाय करत असल्यानं सुरुवातीला मार्केटिंगवर अधिक जोर द्यावा लागणार आहे. तुम्ही कसं प्रमोशन करता, त्यावर तुमच्या परिसरात तुमचा व्यवसाय नावारुपाला येणार आहे. चांगल्या प्रकारे व्यवसाय केल्यास अंदाजे 50000 रुपयांपासून अधिकची कमाई करणं अवघड जाणार नाही.

परवाना आणि कायदेशीर प्रक्रिया

खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसाय सुरू करणार असाल तर त्यासाठी नोंदणी गरजेची आहे. एफएसएसएआय (Food Safety and Standards Authority of India) आणि जीएसटी (Goods and service tax) क्रमांक आवश्यक आहे. त्यासोबतच राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून एनओसी मिळवावी लागणार आहे. व्यवसाय मोठ्या स्तरावर वाढवायचा असेल तर त्यासाठीच्या अतिरिक्त प्रक्रियाही तुम्हाला पार पाडाव्या लागणार आहेत.