Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BO Collection Report: नीयत, 72 हूरें आणि सत्यप्रेम की कथा यांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जवळपास बंद; जाणून घ्या कमाईबद्दल...

BO Collection Report of Niyat, Satyaprem ki katha and 72 hoorain

Image Source : www.movievalue.in

BO Collection Report: कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा 'सत्यप्रेम की कथा', विद्या बालनचा 'नीयत' आणि सत्य घटनेवर आधारित '72 हूरें' एकापाठोपाठ एक चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाले. मात्र या तिन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील कमाई अपेक्षेपेक्षा फारच कमी झाली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवला, जाणून घेऊयात.

सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलीवूड मधील तीन चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कार्यरत आहेत. ज्यामध्ये सत्यप्रेम की कथा (Satyaprem Ki Katha), नीयत (Niyat), आणि 72 हूरें (72 Hoorain) यांचा समावेश आहे. जून महिन्याच्या अखेरीस कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या पाठोपाठ जुलै महिन्यात विद्या बालनचा नीयत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर सत्य घटनेवर आधारित 72 हुरें हा चित्रपट प्रेक्षकांना सिनेमागृहात पाहायला मिळाला. सध्या बॉक्स ऑफिसवर या तिन्ही चित्रपटांची कमाई फारशी चांगली होताना दिसत नाहीये. दिवसेंदिवस या चित्रपटांच्या कमाईत घट होताना पाहायला मिळत आहे. आजच्या घडीला या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे, जाणून घेऊयात.

'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाची कमाई जाणून घ्या

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस (Sameer Vidwans) यांनी दिग्दर्शित केलेला बॉलीवूड चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' 29 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास 17 दिवस झाले आहेत. भूल भुलैय्या-2 नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना कियारा आणि कार्तिक आर्यन यांची जोडी एकत्र पाहायला मिळाली आहे. सध्या हा चित्रपट सिनेमागृहात चालू आहे. मात्र त्याची कमाई फारशी उल्लेखनीय नाही.

काल म्हणजेच रविवारी या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे. रविवारी 2.58 कोटींची कमाई करून या चित्रपटने विकेंड गाजवला आहे. भारतात या चित्रपटाने एकूण 77.69 कोटींची कमाई केली आहे. तर संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 111.4 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट 60 कोटी रुपये इतके आहे. हा चित्रपट 100 कोटींची कमाई करेल की नाही, याबाबत मात्र साशंकता व्यक्त केली जात आहे.

'नीयत' चित्रपटाची कमाई जाणून घ्या

अरुण मेनन (Arun Menon) यांनी दिग्दर्शित केलेला नीयत हा चित्रपट 7 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात मुख्य भूमिकेत विद्या बालनने काम केले आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 9 दिवस झाले आहेत. मात्र या 9 दिवसात चित्रपटाची कमाई फारच कमी झाली आहे. विद्या बालनच्या नियत चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 5. 79 कोटींची कमाई केली आहे. तर संपूर्ण जगभरात 6.9 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट 35 कोटी रुपयांचे आहे.

72 हूरें चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई जाणून घ्या

संजय पुरन सिंग चौहान (Sanjay Puran Singh Chauhan) यांनी दिग्दर्शित केलेला 72 हूरें हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 7 जुलै 2023 रोजी आला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 9 दिवस झाले आहेत. मात्र या चित्रपटाची संपूर्ण कमाई बंद झाली आहे. सत्य घटनेवर आधारित असणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काळ टिकू शकला नाही. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशनने प्रमाणपत्र दिलेले नाही, असाही दावा निर्मात्यांनी केला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्याने केवळ 1.61 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे कलेक्शन आता बंद झाले आहे.

Source: jagran.com