प्रवास हा आपल्या जीवनाचा अविभाज्य आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात कामानिमित्त होणारा प्रवास ते आंतरराष्ट्रीय पर्यटनासारख्या लांब पल्ल्याच्या प्रवासाचा यात समावेश होतो. विमान, बस, रेल्वे, जहाज हे पर्याय आपल्यापुढे उपलब्ध आहेत. मेक माय ट्रीप, गो बायबीबो, एक्सपिडिया, यात्रा डॉट कॉम यांसह अनेक कंपन्यांनी मागील काही वर्षात ट्रॅव्हल इंडस्ट्रीत पाय रोवले आहे. मात्र, हे क्षेत्र, ब्लॉकचैन आणि वेब थ्री सारख्या तंत्रज्ञानामुळे अत्याधुनिक होणार आहे. तिकीट बुकींग आणि इतर सेवांसाठी या तंत्रज्ञानाचा विचार जगभरातील ट्रॅव्हल कंपन्या करत आहेत. हॉटेल, व्हिला बुकींग करणाऱ्या सेवा क्षेत्रातील कंपन्यांही यात उत्सुक आहेत.
Table of contents [Show]
- सेवा क्षेत्राची बाजारपेठ वाढणार
- तिकीट बुक करताना क्रिप्टोकरन्सीचा वापर (Cryptocurrency use while booking tickets)
- ग्राहकांना या तंत्रज्ञानाचा काय फायदे होणार? (What are benefits to customers)
- ब्लॉकचेन तंत्रज्ञान काय आहे? (What is blockchain Technology)
- Web 3.0 म्हणजे काय? (What is web 3.0 Technology)
सेवा क्षेत्राची बाजारपेठ वाढणार
कोरोना विषाणूच्या जगभरातील प्रसारानंतर पर्यटन आणि एकूणच सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला होता. या क्षेत्रातील कंपन्यांना तोटा सहन करावा लागला. मात्र, आता कोरोनाचे संकट गेल्यामुळे सेवा क्षेत्राने पुन्हा एकदा भरारी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवास, पर्यटन सेवा सुरळीत झाली आहे. २०२७ पर्यंत भारतीय प्रवासी बाजारपेठ १२५ बिलीयन डॉलरवर जाईल असा अंदाज, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने (Federation of Indian Chambers of
Commerce & Industry) वर्तवला आहे.
तिकीट बुक करताना क्रिप्टोकरन्सीचा वापर (Cryptocurrency use while booking tickets)
सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी कार्यक्षमता वाढविण्यासाठी ब्लॉकचेन आणि वेब थ्री तंत्रज्ञानावर आधारित टूलचा वापर सुरू केला आहे. या कंपन्या आपल्या सॉफ्टवेअरमध्ये हे नवे तंत्रज्ञान सामावून घेत आहेत. काही कंपन्यांनी तिकीट बुक करताना क्रिप्टोकरन्सी घेण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात याचे प्रमाण आणखी वाढणार आहे.
ग्राहकांना या तंत्रज्ञानाचा काय फायदे होणार? (What are benefits to customers)
सध्या तुम्ही विमानाचे बुक केलेले तिकीट रद्द केले तर तुम्हाला सगळे पैसे रिफंड मिळत नाही. अनेक वेळा तर तुमचे संपूर्ण तिकीटाचे पैसे ऐनवेळी प्लॅनमध्ये बदल झाल्याने वाया जातात. मात्र, ब्लॉकचेन आणि वेब थ्री तंत्रज्ञानाच्या वापरामुळे तुम्ही तुमचे तिकीट दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला विकू शकता. त्यावर नफाही कमवू शकता. हॉटेल बुकिंग, फ्लाइट बुकिंग करताना तुम्हाला हे पर्याय भविष्यात उपलब्ध होतील. त्यामुळे बुकिंग रद्द करण्याचे टेंशन तुम्हाला राहणार नाही. तुमची सगळी रक्कम कधीही तुम्हाला माघारी मिळू शकते. यासह इतरही अनेक फायदे या तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना मिळतील.
ब्लॉकचेन तंत्रज्ञान काय आहे? (What is blockchain Technology)
Blockchain Technology मध्ये, कोणतीही माहिती फक्त एका संगणकावर किंवा सर्व्हरवर साठवली जात नाही. सर्व माहिती जगभरातील सर्व्हरवर साठवली जाते. त्यामुळे हॅकरला ही माहिती चोरता येत नाही. कारण नक्की माहिती कुठे आहे हे त्याला समजत नाही. थोडी थोडी माहिती डिसेंट्रलाइझ्ड पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी साठवली जाते.
Web 3.0 म्हणजे काय? (What is web 3.0 Technology)
2010 पासून, वेब थ्री तंत्रज्ञानावर काम सुरू आहे. या तंत्रज्ञानामध्ये सुद्धा माहिती एका ठिकाणावर साठवून न ठेवता विकेंद्रित पद्धतीने माहिती साठवून ठेवली जाते. माहितीला एक विशिष्ट ओळख मिळण्याकरिता तिला टोकन दिले जाते. या टोकन्सला नॉन-फंजिबल टोकन (Non-fungible token) असेही म्हणतात.