केरळ राज्यातील कोझिकोड जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लू आजार पसरत असून 1 हजार 800 पोल्ट्री पक्षांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोल्ट्री उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बर्डफ्लूचा प्रसार झाल्याने पोल्ट्रीमधील सर्व पक्षांना वेगाने लागण होते, तसेच जिवंत राहिलेले पक्षी, अंडी, खत सर्वकाही नष्ट करावे लागते, यामध्ये पोल्ट्री उद्योजकांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. कोझिकोड राज्यातील पोल्ट्री फार्ममध्ये बर्डफ्लूचा विषाणू आढळून आल्याच्या वृत्ताला सरकारी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
H5N1व्हेरियंटचा प्रसार
राज्यातील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1व्हायरच्या व्हेरियंटचा प्रसार झाल्याचे समोर आले आहे. कोझिकोड येथील कोंबड्यांमध्ये या व्हेरियंटचा विषाणू आढळून आला आहे. या घटनेनंतर राज्यातील पशू वैद्यकीय विभागाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. इतर राज्यात बर्डफ्लूचा प्रसार होऊ नये यासाठी तपासणी सुरू केली आहे.
व्हायरसचे नमुन्यांची तपासणी
H5N1 व्हायरसची अधिक तपासणी करण्यासाठी भोपाळमधील प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यात आले आहेत. या चाचणीतून पोल्ट्री पक्षांमध्ये पसरलेला आजार हा avian influenza मुळेच फैलावला आहे का? हे स्पष्ट होणार आहे. कोझिकोड जिल्ह्यातील ज्या पोल्ट्रीमध्ये बर्डफ्लू आढळून आला होता. तेथील इतर कोंबड्याही नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच परिसरातील इतर पोल्ट्री पक्षांची तपासणी करण्यात येत आहे.
पक्षांमध्ये बर्डफ्लू पसरल्यानंतर काय काळजी घ्यावी
अर्धे उकडलेले अंडे किंवा कमी शिजलेले चिकन खाऊ नये. बर्ड फ्लूचा प्रसार ज्या भागामध्ये झाला आहे त्या भागामध्ये जाणे टाळावे. पक्षांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी. कच्चे मांस घरामध्ये उघडे ठेवू नका. चिकनला विना ग्लोव्ज हात लावू नका. स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणावरून चिकन खरेदी करा. मांसाला हात लावल्यानंतर साबणाने हात धुवा.