Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Billionaire's Houses : जगातील अब्जाधीशांची कोट्यावधी किंमतीची घरं, अँटेलिया सर्वात महागडे घर

Billionaires Mansions

Luxurious Houses of the world : जगातल्या एका घराची किंमत आहे 2 बिलीयन डॉलर तर एका घराची किंमत आहे 240 मिलीयन डॉलर. ही घरं आहेत जगातल्या अब्जाधिशपतीची. असे एकच घर नसून अनेक कोट्यावधी किंमतीची घरं आहेत ज्याच्या किंमती ऐकुन तुम्ही नक्कीच चकित व्हाल.

जगातील पाच अब्जाधीश हे अतिशय महागड्या घरांमध्ये वास्तव्य करतात. त्यांच्या घराच्या किंमती आणि त्यातील सोई-सुविधा या आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. भारतातील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराचाही या मिलिएनिएर हाऊसमध्ये समावेश होतो. तर जाणून घेऊयात हे अब्जाधीश आणि त्यांच्या घरांबद्दल.

अँटेलिया 2 अब्ज डॉलरचे घर

जगातील आघाडीच्या उद्योजकांमध्ये ज्यांची गणना केली जाते तसंच नुकत्याच फोर्ब्सच्या यादीनुसार आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचं हे निवासस्थान आहे. मुकेश अंबानी यांचं हे घर मुंबईमध्ये असून त्याचं नाव अँटेलिया असं आहे. बिझनेस इनसायडर या माध्यमाच्या माहितीनुसार, या घरात तब्बल 27 मजले आहेत. या घरात मंदिर, हॅलिपॅड, थिएटर, बॉलरूम, विविध मजल्यांवर गार्डेन्स आहेत. अंबानी यांच्या मालकीच्या 168 गाड्या ठेवण्यासाठी काही मजल्यांवर तर फक्त पार्किंग आणि गॅरेज  आहे. अशा या लक्झरी घरांसाठी तब्बल 2 अब्ज अमेरिकन डॉलर रूपये खर्च केले आहेत.

Mukesh Ambani’s Antilia

केन ग्रिफिन यांचे 240 मिलीयन डॉलरचे पेंटहाऊस

240 मिलीयन डॉलरचे हे घर आहे अमेरिकेतील केन ग्रिफिन यांच्या मालकीचे. केन ग्रिफिन हे पेशाने फंड मॅनेजर आणि सिटाडेल या कंपनीचे संस्थापक आहेत. न्यूयॉर्क येथील सेंट्रल पार्क साऊथ इथं 23 हजार स्क्वेअर फुटच्या जागेवर केन यांचे पेंटहाऊस आहे. या पेंटहाऊसमध्ये तीन मजले असून 16 शयनकक्ष (बेडरूम्स), 17 स्नानगृह (बाथरूम्स) आणि 5 बाल्कन्या आहेत.

बिल आणि मेलिंडा गेट्स यांचे बीच हाऊस

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या कॅलिफॉर्नियातील बीच हाऊसची किंमत आहे 43 मिलीयन डॉलर. बिल गेट्स व मेलिंडा गेट्स यांनी एप्रिल 2020 मध्येच हे घर खरेदी केले. कॅलिफोर्नियातील सॅन दियागो येथे हे त्यांचे घर आहे. 5, 800 स्क्वेअर फुटच्या या घरात सहा खोल्या आहेत. समुद्राजवळ असलेल्या या घराला जाकुझी, फायर पीट्स स्विमिंग पूल अशा सगळ्या सुविधा आहेत. या बीच हाऊस शिवाय बेल गेट्स यांचे मूळ निवासस्थान हे वॉशिंग्टन मॅशन असून त्याची किंमत 127 मिलीयन डॉलर आहे. 

Bill and Melinda Gates beach house in California

लॉस एंजलीस मधलं 'द मनोर'

लॉस एंजेलीस येथील द मनोर या घराची किंमत आहे चक्क 120 मिलीयन डॉलर. आज मितीला या घराच्या मालकाचे नाव समोर आलेले नाही. मात्र  नवीन घर मालकाने 2019 साली रोख व्यवहार करत हे घर खरेदी केलं होतं. 2019 पर्यंत हे घर पेट्रा एक्लेस्टोन या ब्रिटीश मॉडेल आणि फॅशन डिझायनरचे होते. 56  हजार स्क्वेअर फुटच्या  या घरात 123 खोल्या, 27 बाथरूम्स आणि 14 शयनगृह आहेत. यासह, घरातच नाइटक्लब, ब्यूटीसलोन, टेनिस कोर्टसह  5 एकरचे गार्डेन एरिया आहे.