Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bikaji Foods Listing Today : 'बिकाजी फुड्स' IPO ने केला गुंतणूकदारांचा बंपर फायदा

Bikaji Food's IPO, IPO Price, GMP, Bikaji Food's Share Listing Today

Image Source : www.bikajimh.com

Bikaji Foods debuts at 8% Premium Over IPO price : कंपनीच्या IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला. या IPO च्या माध्यमातून कंपनीने 881 कोटी रुपये उभे केले आहेत.कंपनीचा शेअर NSE वर 322.80 रुपयांवर लिस्ट झाला. IPO मध्ये कंपनीने प्रती शेअर 300 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केला होता.

बिकाजी फूड्स इंटरनॅशनलने (Bikaji Foods International Debut in Market) आज बुधवारी 16 नोव्हेंबर 2022 रोजी BSE आणि NSE या शेअर मार्केट जोरदार एंट्री घेतली. कंपनीचा शेअर NSE वर 322.80 रुपयांवर लिस्ट झाला. IPO मध्ये कंपनीने प्रती शेअर 300 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केला होता. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 8% अधिक फायदा मिळाला. पॅकेज्ड स्नॅक्स मेकरचे शेअर बीएसईवर 7 टक्के प्रीमियमसह 321.15 रुपयांवर सूचीबद्ध झाला. कंपनी आयपीओमधून  837 कोटींचे भांडवल उभारले. 

बिकाजी फूड्स IPO चे GMP वाढला होता

दलाल स्ट्रीटवर सूचीबद्ध होण्यापूर्वी, ग्रे मार्केटमध्ये  बिकाजी फूड्स इंटरनॅशनलचे शेअरचा प्रिमियम 25-30 रुपयांनी वाढला होता. ग्रे मार्केटमध्ये  बिकाजी फूड्स इंटरनॅशनलच्या शेअर्सला मागणी दिसून आली. त्यामुळे बिकाजी फुड्सच्या लिस्टिंगकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. 

'IPO'ला चांगला प्रतिसाद मिळाला  

कंपनीच्या IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला. या IPO च्या माध्यमातून कंपनीने 881 कोटी रुपये उभे केले आहेत. कंपनीचा आयपीओ 3 ते 7 नोव्हेंबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध होता. कंपनीने या IPO साठी 285-300 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला होता आणि तो गुंतवणूकदारांनी सहज स्वीकारला होता. या IPO ला एकूण 26.67 पट सबस्क्रिप्शन मिळाले. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) या श्रेणीमध्ये हा IPO 80.6 पट सबस्क्राइब झाला. त्याच वेळी, हा IPO गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या श्रेणीमध्ये 7.1 पट, किरकोळ विक्रेत्यांच्या श्रेणीमध्ये 4.77 पट आणि कर्मचाऱ्यांच्या श्रेणीमध्ये 4.38 पटीने सबस्क्राईब झाला.

बिकाजी फूड्स शेअर्सची किंमत

आज बुधवारी सकाळी 10:57 वाजता बिकाजी फूड्सचा शेअर 28.15 रुपयांनी म्हणजेच 9.38 टक्क्यांनी वाढून 328.15 रुपयांच्या पातळीवर गेला होता. दिवसभराच्या व्यवहारात शेअरने 334.70 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती.

एफएमसीजी क्षेत्रात वेगाने वाढणारी बिकाजी फूड्स

चटपटीत तयार खाद्यपदार्थ (नमकीन) विक्रीत नावारूपाला आलेली कंपनी म्हणून बिकाजी फुड्सची ओळख आहे. आयपीओ मार्केटमध्ये बिकाजी कंपनीची ओळख हीच तिची ताकद आहे. उत्तर भारतापासून ते ईशान्येपर्यंत सर्व प्रकारच्या नमकीन प्रकारात बिकाजी अग्रेसर आहे. बिकाजी फूड्स ही भारतातील तिसरी सर्वात मोठी एथनिक स्नॅक कंपनी आहे. कंपनी प्रामुख्याने भुजिया, नमकीन, पॅकबंद मिठाई, पापड आणि वेस्टर्न स्नॅक्स या सहा श्रेणींमध्ये उत्पादने विकते. कंपनीकडे चांगले वितरण नेटवर्क आहे. आणि कंपनी एफएमसीजी क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे.