BF Investment locked in lower circuit: बीएफ इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे (BFIL) शेअर्स शुक्रवारी दिनांक 6 जानेवारी रोज जवळपास 10 टक्क्यांनी खालावले. याआधी गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात, लोअर सर्किट बीएसईवर 10 टक्क्यांनी वाढत, शेअर 413 वर पोहोचले होते. कंपनीच्या शेअर्सच्या घसरणीमागे हे एक प्रमुख कारण आहे. म्हणजेच, कंपनीच्या बोर्डाने स्टॉक एक्स्चेंजमधून कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या डीलिस्टिंगच्या प्रस्तावाला सेबीने (Sebi) मान्यता दिलेली नाही. डिलिस्टींग अर्जात आणि प्रक्रियेत सेबीच्या नियमांचे पालन न झाल्यामुळे कंपनीचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे.
पुण्यातील प्रसिद्ध कल्याणी ग्रुपची बीएफ इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ही उपकंपनी आहे. 26 मे 2009 साली या कंपनीची स्थापना कल्याणी ग्रुप मार्फत करण्यात आली होती. ही गुंतवणूक करणारी फायनॅन्स कंपनी आहे.
काय आहे प्रकरण? (What is the matter?)-
सेबीच्या डिलिस्टिंग नियमांचे पालन न केल्यामुळे कंपनीला भारतीय बाजारातून डिलिस्ट करण्याचा प्रवर्तकांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर कल्याणी ग्रुप कंपनी बीएफ इन्व्हेस्टमेंट्सचे शेअर्स घसरले. गेल्या आठवड्यात 30 डिसेंबर रोजी कंपनीच्या घोषणेने प्रेरित होऊन, पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये स्टॉकमध्ये 44 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली होती. त्यानंतर असे सांगण्यात आले की, डिलिस्टिंग प्रस्तावावर विचार करण्यासाठी बोर्डाची 4 जानेवारी 2023 रोजी बैठक होईल. हा प्रस्ताव सध्या बोर्डाने मंजूर केला नसून, यावर पुन:श्च चर्चा होणार आहे. त्यामुळे अजूनही कंपनीचे स्टॉक डिलिस्टिंग होणार की नाही हे ठरायचे आहे.
बीएफ इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर डिलिस्टींग होणार ही बातमी बाजारात पसरल्यावर, गुंतवणुकदारांनी स्वत:कडील शेअर विकण्यास सुरुवात केली आणि बाजारात या शेअरधारकांमध्ये जणूकाही चढाओढ लागली की कोण पहिले आणि जास्त किंमतीत शेअर विकणार आहे.