भारतीय फार्मा कंपन्या नेहमीच नवं तंत्रज्ञान वापरून, योग्य संशोधन आणि नव्या कल्पनांना चालना देण्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय फार्म कंपन्यांचे स्टॉक्सही नेहमीच तेजीत असलेले पाहायला मिळतात. भारतीय औषध उद्योग आगामी काही काळात 130 अब्ज युएस डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचं स्वप्न उराशी घेऊन आहे.
शेअर बाजाराबद्दल बोलायचं झधालं तर या क्षेत्रातही भारतीय औषध उद्योग आपला दबदबा ठेवून आहे. आज जागतिक फार्मा दिवसाच्या निमित्ताने आपण भारतातील सर्वोत्तम फार्मा स्टॉक्स कोणते आहेत यावर एक नजर टाकणार आहोत.
भारतातले सर्वोत्तम फार्मा स्टॉक्स कोणते?
सन फार्मा
सर्वोत्तम फार्मा स्टॉक्सबद्दल बोलायचं झालं तर भारतात सन फार्माचा स्टॉक महत्वाचा म्हणून पाहिला जातो. सन फार्मा भारतातील सर्वात मोठा औषध निर्माता आहे. ही कंपनी 2 लाख कोटींचा मार्केट कॅप ठेवते यावरून या कंपनीचं बाजारातलं महत्व काय आहे हे लक्षात घेता येईल.सन फार्मा जगातील चौथी सर्वात मोठी औषध कंपनी आहे आणि या कंपनीचा महसूल 5.1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं.
डिविस लॅबोरेटरीज लिमिटेड
हैदराबाद इथं कार्यरत असणारी ही कंपनीही औषध कंपन्यांचा दादा म्हणून प्रचलित आहे. दिवी मुरली कृष्ण प्रसाद यांनी 1990 मध्ये ही कंपनी स्थापन केली होती. आज या कंपनीचे मूल्य ३० हजार कोटीं रुपयांच्या घरात आहे. ही कंपनी अद्ययावत औषध सामग्रीच्या बाबत सर्वात पुढे असणारी कंपनी आहे. युरोप आणि अमेरिकेतही या कंपनीचा विस्तार झाला आहे. या कंपनीची निव्वळ वार्षिक विक्री उलाढाल 8 हजार 879 कोटी रुपयांच्या घरात आहे.
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड
ज्यांना भारतीय औषधांच्या टॉप 5 कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल त्यांनी नक्कीच डॉ. रेड्डीजचे शेअर्स विकत घ्यावे. कल्लम अंजी रेड्डी यांनी 1984 मध्ये डॉ रेड्डीज लॅबोरेटरीजची स्थापना केली.औषधं, जागतिक जेनेरिक उत्पादनं यासाठी ही कंपनी ओळखली जाते. परवडणाऱ्या किमतीत औषधं देण्यास वचनबद्ध असणाऱ्या कंपन्यामध्ये ही कंपनी पाहिली गेली आहे. या कंपनीची वार्षिक निव्वळ विक्री उलाढाल 14 हजार 450 कोटी रुपयांच्या घरात आहे.
सिप्ला
भारतीय स्वातंत्र्यसैनिक ख्वाजा अब्दुल हमीद यांनी 1835 मध्ये सिप्लाची स्थापना केली होती. सिप्ला प्रामुख्याने अँन्टीव्हायरल औषधांच्याबाबतीत अग्रेसर असणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीकडे 1500 हून अधिक उत्पादनं आहेत.सिप्लाची वार्षिक निव्वळ विक्री उलाढाल 13 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
अपोलो हॉस्पिटल्स
भलेही अपोलो हॉस्पिटल्स ही फार्मा कंपनी नाही. मात्र ही भारतातली सर्वात मोठी हॉस्पिटल चेन आहे. 1983 साली अपोलो हॉस्पिटल्सची स्थापना झाली होती. देशातल्या सर्वोत्तम हेल्थकेअर स्टॉक्समध्ये अपोलो हॉस्पिटल्स हे अग्रगण्य नाव समजलं जातं.